🕒 1 min read
लाहोर: पाकिस्तानच्या नॅशनल विधानसभेत मोठा ड्रामा पाहायला मिळत आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव नॅशनल विधानसभेचे डेप्युटी स्पीकर कासिम खान सूरी यांनी फेटाळून लावला आहे.
विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव पाकिस्तानच्या संविधानाच्या आर्टिकल 5 च्या विरोधात असून असंवैधानिक असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे विरोधकांनी स्पीकर असद कैसर यांच्या विरोधातही अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यामुळे सूरी यांनी कामकाज पाहिलं. सूरी यांनी अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर इम्रान खान यांनी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्याकडे पाकिस्तानची संसद बरखास्त करण्याची शिफारस केली आहे.
राष्ट्रपतींनी संसद बरखास्त केल्यास पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा सार्वजनिक निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे देशातील जनतेने आता निवडणुकीची तयारी करावी, असं आवाहन इम्रान खान यांनी देशाला संबोधित करताना केले.
महत्वाच्या बातम्या –
राज ठाकरेंच्या कालच्या भाषणातून बाळासाहेबांची आठवण झाली – चंद्रकांत पाटील
Women’s World Cup Final : अजिंक्य ऑस्ट्रेलिया..! इंग्लंडला धूळ चारत कागांरूंची विक्रमी जगज्जेतेपदावर मोहोर
“…हे भूमिपूजन एक नौटंकी”, ठाकरे सरकारवर निलेश राणेंचा हल्लाबोल
IPL 2O22 सुरू असताना भारताच्या माजी क्रिकेटरला झाला कोरोना; शास्त्री, रैना चिंतेत!
PAK vs AUS: काय सांगता! पाकिस्तानने २० वर्षांनी जिंकली मालिका, बाबर- इमामने कांगारूंना धुतले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
