🕒 1 min read
कोल्हापूर : चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरात पत्रकार परिषदेत बोलत असताना राज ठाकरेंच्या कालच्या भाषणावर मत व्यक्त केले. म्हणाले, “मी धर्माध नाही पण धर्माभिमानी आहे” हे राज ठाकरेंच वाक्य आवडलं. हिंदू या शब्दात सर्व धर्म समभाव आहे. हिंदू म्हणजे बुरसटलेला असं चित्र निर्माण केलं गेल आहे. कालच्या भाषणातून बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली असल्याचे बोलले.
ते पुढे म्हणाले, कोल्हापुरकरांना कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने थेट पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठ्याचे स्वप्न दाखवले. हे दाखवताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी घोषणा केली होती की, पुढच्या दिवाळीला कोल्हापुरकरांची अंघोळ थेट पाइपलाइन द्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याने घालू. पण मुळात थेट पाइपलाईनचे पाणी पिण्यासाठी आहे, अंघोळीसाठी नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. तसेच मुश्रीफ सध्या गडबडले असल्याने ते अशी वक्तव्ये करत असल्याची टीकाही चंद्रकात पाटलांनी यावेळी केली.
कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ आज रुईकर कॉलनी येथे कॉफी पे चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवरती टीका केली. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, भाजपा उमेदवार सत्यजित कदम, सहसेवा ट्रस्टचे अध्यक्ष सन्मति मिरजे यांच्या सह भागातील नागरिक उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या –

