Share

जान्हवी कपूरने प्लॅस्टिक सर्जरी केलीय काय? फोटो पाहून चाहते म्हणाले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची फॅशन स्टाइल नेहमीच चर्चेत असते. तिने काहीही परिधान केले तरी ते ट्रेंडिंग व्हायला वेळ लागत नाही. अलीकडेच जान्हवीने एका अवॉर्ड शोमध्ये हजेरी लावली होती जिथे तिने तिच्या हॉट लुकने सर्वांना वेड लावले होते. पण काही लोकांना तिचा लूक आवडला नाही आणि त्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. काही लोकांनी तर जान्हवी कपूरच्या प्लास्टिक सर्जरीचा अंदाज लावला आहे.

जान्हवी कपूरने अवॉर्ड फंक्शनमध्ये परिधान केलेल्या ड्रेसमधील तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूप हॉट आणि ग्लॅमरस दिसत होती. फोटोंमध्ये, जान्हवी डीप नेकलाइन चमकदार बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसली. फोटोशूटदरम्यान तिने तिची परफेक्ट फिगर दाखवली. न्यूड मेकअप आणि पोनीटेल हेअरस्टाइलमुळे जान्हवी कपूरचा लूक अधिक हॉट झाला होता. पण आता जान्हवीच्या या लूकची तुलना किम कार्दशियनशी केली जात आहे. कमेंट सेक्शनमध्ये तिची खिल्ली उडवली जात आहे.

कमेंट सेक्शनमध्ये एका यूजरने लिहिले की, ‘गरीबांची किम कार्दशियन’.  दुसऱ्याने ‘भारतीय किम कार्दशियन’ अशी कमेंट केली. ‘कार्दशियन लाइट’ असं कुणीतरी लिहिलंय. त्याचवेळी दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘किम कार्दशियनचे भारतीय व्हर्जन’. अशा प्रकारे जान्हवी कपूरला ट्रोल केले जात आहे.

त्याचबरोबर काही युजर्सनी जान्हवी कपूरला प्लास्टिक कापूर म्हटले आहे. जान्हवी कपूरने प्लॅस्टिक सर्जरी केली आहे, त्यामुळे तिचा लूक पूर्वीपेक्षा वेगळा दिसत असल्याचा अंदाज लोकांनी लावला आहे. यावर एका यूजरने कमेंट करताना ‘प्लॅस्टिक सर्जरीवर किती खर्च केला’, असे विचारले.  दुसर्‍याने लिहिले की, ‘सर्जरीद्वारे संपूर्ण शरीर आणि चेहरा बदलण्यात आला आहे’.  कोणीतरी ‘प्लास्टिक कपूर’ अशी कमेंट केली.

महत्वाच्या बातम्या :

Women’s World Cup Final : पंतप्रधान मोदींनी दिल्या ऑस्ट्रेलियन संघाला शुभेच्छा; काय म्हणाले ते एकदा वाचाच!
बॅंक खात्याला आधारकार्ड जोडा; अन्यथा ‘या’ योजनेचा ‘आधार’ जाईल!
“The Kashmir Files” करण जोहरने दिग्दर्शकाला दिला सल्ला  
महागाई कमी होवो; गिरीश बापटांच्या जनतेला शुभेच्छा
IPL 2022 MI vs RR : राजस्थानचं मुंबईला १९४ धावांचं आव्हान; बटलरचं शतक, तर हेटमायरकडून धुलाई!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!