🕒 1 min read
दिल्ली : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी गुडीपाडव्यानिमित्त देशातील महागाई कमी होवो, अशी पार्थना करत नागरिकांना अनोख्या शुभेच्छा दिल्या. बापट म्हणाले, आज पहिल्यांदाच पुणे सोडून दिल्लीमध्ये पाडवा साजरा करत आहे. आज खूप आनंदाचा क्षण आहे. मला असं वाटतं की, आजच्या गुढीपाडव्याच्या मंगलमय दिवशी एक संकल्पही केला पाहिजे. सध्या देशाची परिस्थिती, महागाई व कोरोना संकट या सगळ्या पीडा निघून जावोत.
तसंच मोदींच्या नेतृत्वाखाली जगाचं नेतृत्व करणाऱ्या भारत देशाची पुन्हा गती होवो. ही स्फूर्ती गुढीपाडव्याच्या निमित्ताने येते. गुढी उभारणे म्हणजे संकल्प उभारणं आहे. संकल्प आणि सिद्धी यांच्यामधील अंतर प्रयत्नाने पूर्ण करायचं असतं. मी माझ्या महाराष्ट्रातील तमाम बांधवांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत आहे, असे म्हणाले.
देशावर मागील दोन वर्षांपासून कोरोनाचं संकट होतं. आता देशात कोरोनाची प्रकरणं कमी झाली आहेत आणि अनेक निर्बंध हटवण्यात आले आहेत. मात्र आता देशभरात महागाई सतत वाढतच आहे. पेट्रोल-डिझेल, एलपीजी गॅस, दूध अशा अनेक दररोजच्या गरजेच्या वस्तूंची किमतीत वाढ झाली आहे. अशात सर्वसामान्यांना आता पुन्हा एकदा फटका बसणार आहे. साबण, बिस्किट, कॉफी, डिटर्जेंट पावडर अशा दररोज लागणाऱ्या वस्तूंचे दर वाढले आहेत. याच पार्श्भूमीवर गिरीश बापट यांनी देशातील महागाई कमी होवो, अशी प्रार्थना केली आहे.
महत्वाच्या बातम्या –
गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर सुभाष घई यांच्या ‘माय डॅड्स वेडिंग’ चित्रपटाचे पोस्टर आउट
IPL 2022 : जबरदस्त..! मुंबईविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसननं ठोकलं द्विशतक
IPL 2022 : एकेकाळी मुंबईसाठी खेळणाऱ्या बटलरनं मुंबईलाच धुतलं; एका ओव्हरमध्ये ठोकल्या २६ धावा!
गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर AAP ला गांधींची आठवण!
यंदाच्या अर्थसंकल्पात राज्याची अर्थव्यवस्था १ कोटी ट्रिलीयन डॉलरपर्यंत वाढवण्याचं उद्दीष्टं – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
