पुणे : पीएम किसान योजनेत नियमितता साधण्यासाठी नवनवीन नियम लागू केले जातात. आता ज्या शेतकऱ्यांचे आधारकार्ड हे बँक खात्याशी संलग्न आहे, त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता खात्यावर जमा होणार आहे.
त्यामुळे e-KYC बरोबरच शेतकऱ्यांना आपले आधार कार्ड हे बॅंक खात्याशी संलग्न आहे की नाही याची तपासणी करावी लागणार आहे. मात्र, राज्यातील तब्बल 17 लाख 50 हजारहून अधिक शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे खात्याशी संलग्नच नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत वाटपात अडचणी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांनी बॅंकेमध्ये जाऊन आधारची माहिती खात्याशी संलग्न करुन घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांना थेट लाभाचा फायदा होईल. तसेच ज्या लाभार्थ्यांनी योजनेत नोंदणी करताना आधार क्रमांक दिलेला नाही किंवा आधारमध्ये काही त्रुटी आहेत अशा लाभार्थ्यांना तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या –

