Share

साईलचा मनसुख हिरेन तर करण्यात आलेला नाही ना?; भातखळकरांनी व्यक्त केली शंका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणातील अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक केल्यानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे पंच साक्षीदार प्रभाकर साईल(Prabhakar Sail) यांचा काल (१ एप्रिल ) मृत्यू झाला. त्यांचे वकील तुषार खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार चेंबूर येथील माहुल भागातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने साईल यांचा मृत्यू झाला. आज सकाळी ११ वाजता प्रभाकर साईलचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी अंधेरी येथील त्यांच्या घरी आणले जाईल. तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. मात्र भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी यावर शंका व्यक्त करत सवाल केला आहे.

“मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा मृत्यू झाला आहे. साईलचा मनसुख हिरेन तर करण्यात आलेला नाही ना?”, अशी शंका व्यक्त करणारे ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे. त्यांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळातही चर्चा केल्या जात आहेत.

दरम्यान आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात ज्या क्रूझवरून अटक करण्यात आली होती, तेथे आपण हजर असल्याचा दावा प्रभाकर साईल यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हणत मुंबई पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रारही केली होती. किरण गोसावी यांचा सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या प्रभाकर साईल यांनी मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. तसेच आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटी रुपयांची मागणी शाहरुख खानकडे करण्यात आली असल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यामुळे अनेक धक्कादायक दावे करणाऱ्या प्रभाकर साईल यांचा मृत्यू झाल्याने अनेक चर्चांना उधान आले आहे.

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी! आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील NCB पंच प्रभाकर साईलचा मृत्यू

“…जुमलेबाज़ मोदी सरकार”, महागाईच्या मुद्द्यावरून नाना पटोलेंचे टीकास्त्र

“कोतेपणालाही लाज वाटावी असे मुख्यमंत्र्यांचे वर्तन…”, मेट्रो लोकार्पण निमंत्रणावरून भातखळकरांचा टोला

“ही महाविकास आघाडी नव्हे तर नाराज तिघाडी”, केशव उपाध्येंचे टीकास्त्र

मुख्यमंत्र्यांनी कोरोना निर्बंध हटवून राज्यातील जनतेला गुढीपाडव्याची अनोखी भेट दिली- अजित पवार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!