Share

IPL 2022: उमेश यादवने उडवली पंजाबची विकेट! केकेआर १३८ धावांचा पाठलाग करणार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना खेळला जात आहे. ज्यामध्ये श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. अशा स्थितीत केकेआरच्या उमेश यादवने प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाब किंग्जच्या फलंदाजांना हैराण करून सोडले आहे. त्याच्या धुव्वादार गोलंदाजीच्या बळावर केकेआरने पंजाबला १३७ धावांवर सर्वबाद केले.

उमेश यादवने पहिल्याच ओव्हरमध्ये पंजाबचा (PBKS) कर्णधार मयंक अग्रवालला १ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर सॅम बिलिंग्सही लवकर माघारी परतला. त्यानंतर आलेल्या भानुका राजपक्षेने पंजाबची खेळी सांभाळली आणि ३१ महत्वपूर्ण धावा केल्या ज्यात ३ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. दुसरीकडे KKRच्या गोलंदाजीने विकेट्स घेणे सुरु ठेवले. उमेश यादवने (Umesh yadav) या सामन्यात ४ विकेट्स घेत स्पर्धेत पर्पल कॅप आपल्या नावे केली आहे.

एका वेळी १०० धावाही पूर्ण होते का नाही या विचारत असलेल्या पंजाब किंग्जला ओडियन स्मिथ आणि सामन्यात पर्दापण करण्याऱ्या कागिसो रबाडाने तारले. मधल्या फळीतील खराब फलंदाजीनंतर शेवटच्या काही षटकात पंजाब पुनरागमन करताना दिसला. मात्र केकेआरच्या साऊदीने रबाडाची विकेट काढताच पंजाबची खेळी ढासळली. पंजाबची शेवटची विकेट अर्शदीप सिंगच्या रन आऊटने पडली. कोलकाताचे फलंदाज आता १३८ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानावर उतरतील.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!