Share

IPL 2022: सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड मोडल्यानंतर मलिंगाने दिली प्रतिक्रिया ; डीजे ब्रावोसाठी केले खास ट्विट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: गेल्या काही वर्षांपासून चेन्नई सुपर किंग्जचा घातक गोलंदाज ड्वेन ब्राव्होने आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करत आहे. त्याने आपल्या संघासाठी अनेक विकेट्स घेतल्या आहेत. लखनऊ विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाचा विक्रमही मोडीत काढला आहे. ब्रावो आयपीएल इतिहासातील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. लसिथ मलिंगाने यावर प्रतिक्रिया देताना ड्वेन ब्राव्होचे कौतुक केले आहे.

MIचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने (lasith malinga) त्याच्या ट्विटर अकाऊंटवर चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) गोलंदाज ड्वेन ब्रावोचे (dwayne barvo) कौतुक करणारे ट्विट केले आहे. त्याने ड्वेन ब्रावोसाठी ट्विट करत लिहिले की, “ब्रावो एक चॅम्पियन गोलंदाज आहे. IPL इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनल्याबद्दल अभिनंदन अजून पुढे जाशील मित्रा.”

लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात ड्वेन ब्रावोने दीपक हुडाची विकेट घेतली आणि लसिथ मलिंगाचा विक्रम मोडित काढला. मलिंगाने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत एकूण १७० विकेट्स घेतल्या आहेत, तर ब्रावोने झालेल्या सामन्यात १७१ विकेट घेतल्या आहेत. विशेष म्हणजे ब्रावोने मुंबई इंडियन्समधून आयपीएलमध्ये पर्दापण केले होते.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!