🕒 1 min read
मुंबई: आयपीएल २०२२ चा ८ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज (KKR vs PBKS) यांच्यात आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला आत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकत केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तरपंजाबसाठी पहिला सामना मुकल्यानंतर कागिसो रबाडा पर्दापण करत आहे. ज्यामुळे पंजाबच्या गोलंदाजी युनिटला केकेआर विरुद्ध अजून बळ मिळणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात बरोबरीची स्पर्धा पाहायला मिळते. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत दोघेही २९ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. यापैकी १९ वेळा निकाल कोलकात्याच्या बाजूने लागला आहे. तर पंजाब संघाने १० वेळा विजय मिळवला आहे. पण, सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे शेवटच्या ३ पैकी २ सामन्यात कोलकाता आपले लक्ष्य राखू शकला नाही. यावेळी आयपीएलमध्ये दोन्ही संघ स्टार्सने सज्ज आहेत, त्यामुळे या सामन्यातील टक्कर जोरदार होणार आहे.
दोन्ही संघ
कोलकाता नाईट रायडर्स : अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर (C), सॅम बिलिंग्स ((WK), आंद्रे रसेल, सुनील नरेन, टीम साऊथी, उमेश यादव, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती
पंजाब किंग्ज : मयंक अग्रवाल (C), शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, भानुका राजपक्षे (WK), शाहरुख खान, ओडियन स्मिथ, राज बावा, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, राहुल चहर
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- मुंबई मेट्रो लोकार्पण सोहळ्याचे फडणवीसांना निमंत्रण नाही!
- चंदीगड पूर्ण पंजाबच्या ताब्यात द्या – भगवंत मान यांची केंद्राकडे मागणी
- अनुपम खेर यांना मिठी मारून ढसाढसा रडले विवेक अग्निहोत्री; व्हिडिओ होतोय व्हायरल
- ‘राधे माँ’चा मुलगा आहे बॉलिवूड अभिनेता; तुम्ही पाहिलेत का?
- PAK vs AUS: अबब! ५६ चौकार आणि १८ षटकार.. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत मिळवला ऐतिहासिक विजय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
