🕒 1 min read
पुणे : घरगुती गॅस सिलेंडर महागला असून सर्वसामान्यांना महागाईचा चांगलाच फटका बसला आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलमध्येही ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर महागाईच्या विरोधात काँग्रेसने देशव्यापी मोहीम हाती घेतली आहे.
यासंदर्भात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘महागाईच्या विरोधात काँग्रेसने देशव्यापी मोहीम हाती घेतली आहे. मी आज पुण्यातील अलका टॉकीज चौकात पुणे काँग्रेस आयोजित ‘महागाई मुक्त भारत’ जन आंदोलनात सहभागी झालो व महागाईची गुढी उभारून सर्वसामान्य जनतेची लूट करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध केला.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल, डाळी अशा सर्वच गोष्टींचे दर दररोज वाढत आहेत. सर्वसामान्यांचे जगणे मुष्कील झाले आहे. इंधन दरवाढ करून महागाई वाढवून सर्वसामान्य जनतेच्या कष्टाच्या कमाईवर दरोडा घालणा-या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही.’
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून प्रत्येक दिवस ‘April Fool’s Day’; काँग्रेसचा टोला
- “पाकीटमारीत तर तुमची PHD असेल”, संजय राऊतांच्या टीकेवर निलेश राणेंचे प्रत्युत्तर
- IPL 2022: अरेरे! ‘बेबी एबी’ आयुष बदोनीच्या षटकाराने स्टॅन्डमधील महिला प्रेक्षक घायाळ
- CNG आणि PNG गॅसच्या दरांत झाली घट; अजित पवारांची माहिती
- “पवार साहेब तुमचा हिंदूद्रोही चेहरा दिसू दे जगाला”, भातखळकरांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
