🕒 1 min read
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे वकील सतीश उके यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या कारवाईवर प्रतिक्रिया देत शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut ) यांनी केंद्रीय तपास यंत्रणांची प्रतिमा धुळीस मिळाली असून आता रेल्वेत होणाऱ्या पाकिटमारींचा तपास सीबीआय आणि ईडीकडून करण्याचीच तेवढी गरज आहे, असे वक्तव्य केले. दरम्यान, संजय राऊतांच्या या वक्तव्यावर आता भाजप नेते निलेश राणेंनी (Nilesh Rane) प्रत्युत्तर दिले आहे.
यासंदर्भात निलेश राणेंनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘त्यात पण कोण शिवसैनिक निघाला तर वांदे होतील. पाकीटमारीत तर तुमची PHD असेल, इतके वर्ष त्यावरच तर घर चालू आहे. विचार करून बोला…’, असे राणे म्हणाले आहेत.
दरम्यान, ‘ज्या प्रकारे काश्मीरमध्ये अचानक अतिरेकी घुसतात. बॉम्ब हल्ले करतात आणि निघून जातात. त्याच प्रकारे या केंद्राच्या अतिरेकी कारवाया होत आहेत. ईडीला राज्यात घुसवलं जातं आणि ते अटक करून निघून जातात. यातून संघर्ष निर्माण झाला तर केंद्र आणि राज्य हा संघर्ष फार मोठ्या प्रमाणात होऊ शकेल. म्हणून ममता बॅनर्जी यांनी गैरभाजप शासित राज्यातील मुख्यमंत्र्यांना पत्रं पाठवलं असून त्यांनी हे पत्रं याच भूमिकेतून लिहिलं आहे. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांची प्रतिमा धुळीस मिळाली आहे. आता रेल्वेत होणाऱ्या पाकिटमारींचा तपास सीबीआय आणि ईडीकडून करण्याचीच तेवढी गरज आहे’, असे संजय राऊत प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- April Fool’s Day : मोदी सरकार सत्तेत आल्यापासून जनतेचीच मोठी फसवणूक झालीये म्हणत राष्ट्रवादीचे आंदोलन
- IPL 2022: CSK vs LSG सामन्यात धोनीने रचला नवा इतिहास; रोहित – विराटलाही मागे सोडले
- “मोदींच्या काळात हुकुमशाहीचा अनुभव” शत्रुघ्न सिन्हा यांचा मोदींवर निशाणा
- “शरद पवार भीष्म पितामह तर देवेंद्र फडणवीस अर्जुन”, राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मोहित कंबोज यांची टीका
- “पवार साहेब तुमचा हिंदूद्रोही चेहरा दिसू दे जगाला”, भातखळकरांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
