🕒 1 min read
मुंबई: आजचा दिवस जगभरात ‘एप्रिल फूल डे’ म्हणून ओळखला जातो. एकमेकांची फसवणूक करून मजेत हा दिवस साजरा केला जातो. पण भारतात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून जनतेचीच मोठी फसवणूक झाली आहे. असा खोचक टोला लगावत आज (१ एप्रिल) राष्ट्रवादीने मोदी सरकार विरोधात आंदोलन केले.
सतत वाढणारी महागाई, इंधन दरवाढ, वाढती बेरोजगारी, अच्छे दिनच्या नावाखाली जनतेला आलेले बुरे दिन यामुळे भारतातील जनतेची मोठी फसवणूक झाली आहे. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्त्वाखाली आज ‘एप्रिल फूल डे’ चे औचित्य साधून पंतप्रधान मोदींच्या खोट्या आश्वासनांचा वाढदिवस साजरा केला गेला.
केंद्र सरकार ज्या ईडीच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच मुंबईमधील ईडी कार्यालयासमोर असलेल्या पेट्रोल पंपावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हे अनोखे आंदोलन केले. मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत मोदींच्या फसव्या आश्वासनांचा केक कापण्यात आला. यावेळी प्रदेश युवक उपाध्यक्ष अमोल मातेले, नवी मुंबई युवक जिल्हाध्यक्ष अन्नू आंग्रे, मोहसीन शेख, वीरू वाघमारे, गौतम आगा, सुनील पालवे, नाजीर शेख तसेच अन्य युवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:
“पवार साहेब तुमचा हिंदूद्रोही चेहरा दिसू दे जगाला”, भातखळकरांचा टोला
अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन
“मोदींच्या काळात हुकुमशाहीचा अनुभव” शत्रुघ्न सिन्हा यांचा मोदींवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
