Share

मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून प्रत्येक दिवस ‘April Fool’s Day’; काँग्रेसचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आजचा दिवस जगभरात ‘एप्रिल फूल डे’ म्हणून ओळखला जातो. एकमेकांची फसवणूक करून मजेत हा दिवस साजरा केला जातो. पण भारतात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून एप्रिल फूल डे या दिवसाचे महत्व कमी झाल्याची टीका काँग्रेस नेते तथा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (nitin raut) यांनी केली आहे.

“मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून एप्रिल फूल दिवसाचे महत्त्व हरवले आहे. आता प्रत्येक दिवस एप्रिल फूल डे आहे.”, असे ट्वीट नितीन राऊत यांनी केले आहे. दरम्यान आजच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपवर निशाणा साधला आहे. सतत वाढणारी महागाई, इंधन दरवाढ, वाढती बेरोजगारी, अच्छे दिनच्या नावाखाली जनतेला आलेले बुरे दिन यामुळे भारतातील जनतेची मोठी फसवणूक झाली आहे. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्त्वाखाली आज ‘एप्रिल फूल डे’ चे औचित्य साधून पंतप्रधान मोदींच्या खोट्या आश्वासनांचा वाढदिवस साजरा केला गेला.

केंद्र सरकार ज्या ईडीच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच मुंबईमधील ईडी कार्यालयासमोर असलेल्या पेट्रोल पंपावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हे अनोखे आंदोलन केले. मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत मोदींच्या फसव्या आश्वासनांचा केक कापण्यात आला. 

महत्वाच्या बातम्या:

IPL 2022: CSK vs LSG सामन्यात धोनीने रचला नवा इतिहास; रोहित – विराटलाही मागे सोडले

April Fool’s Day : मोदी सरकार सत्तेत आल्यापासून जनतेचीच मोठी फसवणूक झालीये म्हणत राष्ट्रवादीचे आंदोलन

“पवार साहेब तुमचा हिंदूद्रोही चेहरा दिसू दे जगाला”, भातखळकरांचा टोला

अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन

IPL 2022: CSK vs LSG सामन्यात ‘या’ परदेशी खेळाडूने दाखवला जलवा; एक दोन नव्हे तर चार पुरस्कार पटकावले!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!