🕒 1 min read
मुंबई: विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटामुळे राजकीय वातावरणही रंगताना दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar ) यांनी यावर प्रतिक्रिया देत ‘द काश्मीर फाईल्स या चित्रपटाला परवानगी देण्याची गरज नव्हती. असे म्हटले आहे. तर यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar ) यांनीही ट्वीट करत पवारांना टोला लगावला आहे.
“‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपटाला परवानगी देण्याची गरज नव्हती इति शरद पवार. पवार साहेब, बंदी घालाना सिनेमावर, तुमचा हिंदू द्रोही चेहरा दिसू दे जगाला.”, असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत लगावला आहे.
शरद पवार काय म्हणाले?
‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या माध्यमातून अपप्रचार करून देशात विषारी वातावरण भाजप करत आहे. काश्मीर खोऱ्यातील पंडितांचं पलायन झाले तसे तेथील मुस्लिम ही बळी पडले आहेत. पाकिस्तान धार्जिणी काही संघटना या पंडितांवरील हल्ल्यांना जबाबदार आहेत. त्यामुळे या चित्रपटाला परवानगी देण्याची गरज नव्हती. असे शरद पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
“मोदींच्या काळात हुकुमशाहीचा अनुभव” शत्रुघ्न सिन्हा यांचा मोदींवर निशाणा
IPL 2022: CSKच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर संतापला कर्णधार जडेजा; खराब कामगिरीचे कारण केले स्पष्ट
IPL 2022: CSK विरुद्ध शानदार विजयानंतर कर्णधार राहुलने केले ‘या’ खेळाडूचे कौतुक; म्हणाला ‘तो फायटर…’
“जुन्या पोस्ट काढून खेळणाऱ्या विकृत सोशल भावांनो…”, रुपाली पाटलांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
