Share

IPL 2022: अरेरे! ‘बेबी एबी’ आयुष बदोनीच्या षटकाराने स्टॅन्डमधील महिला प्रेक्षक घायाळ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: IPL 2022 मध्ये, लीग टप्प्यातील सातवा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने लखनऊ समोर २११ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. पण लखनऊच्या फलंदाजांनी अतिशय धाडसी फलंदाजी करत सामना ३ चेंडू आधी संपवला. सुपर जायंट्सने हा सामना ६ विकेटने जिंकला. या सामन्यादरम्यान आयुष बदोनीने षटकार ठोकला. ज्यामुळे स्टॅन्डमधील एक प्रेक्षक घायाळ झाली.

झाले असे की , सुपर जायंट्सला (LSG) सामना जिंकण्यासाठी १२ चेंडूत ३४ धावांची गरज होती, त्यानंतर चेन्नईकडून अष्टपैलू शिवम दुबे (shivam dube) गोलंदाजीसाठी आला. दुसरीकडे, एविन लुईस (evin lewis) आणि संघाचा एबी बेबी आयुष बडोनी (ayush badoni) लखनऊकडून खेळपट्टीवर उभे होते. त्याच वेळी, १९ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आयुषने शिवम दुबेच्या चेंडूवर स्वीप शॉट खेळला आणि चेंडू थेट स्टँडमध्ये पाठवला. हा षटकार लखनऊसाठी खूप महत्त्वाचा होता.

https://twitter.com/deepakdwivedi14/status/1509595710093594641?s=20&t=1xyk-XJaHGg7CHrxMpxuzg

मात्र आयुषच्या या शॉटमुळे स्टॅन्डमध्ये बसलेली एक महिला जखमी झाली. प्रत्यक्षात चेंडू थेट महिलेच्या डोक्याला लागला. यानंतर महिला काही वेळ डोके धरून उभी दिसली. मात्र जखम गंभीर नसल्याने कोणतीही हानी झाली नाही. आयुष आणि एविन लुईसच्या दमदार खेळीने लखनऊने हा सामना आरामात जिंकला.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!