🕒 1 min read
मुंबई:अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार राज्यातील ‘सीएनजी’, ‘पीएनजी’सारख्या नैसर्गिक गॅसवरील मुल्यवर्धीत कराचा (व्हॅट) दर आज १ एप्रिल २०२२ पासून १३.५ टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत कमी झाल्यानं राज्यात घराघरांत पाईपद्वारे मिळणारा स्वयंपाकाचा गॅस तसंच वाहनांसाठीचा सीएनजी इंधन स्वस्त झाला आहे.अशी माहिती उप मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे.
मुंबई आणि परिसरात सीएनजी प्रतिकिलो ६ रु. स्वस्त, पीएनजी हा पाईपद्वारे स्वयंपाकाचा गॅस प्रति एससीएम (स्टॅन्डर्ड क्युबिक मीटर) ३ रु. ५० पैशांनी स्वस्त झाला आहे. मुंबई परिसरात नवीन दराप्रमाणे सीएनजी ६० रु. प्रति किलो तर पीएनजी ३६ रु. प्रति एससीएम असेल.अशी माहिती अजित पवार यांनी ट्वीट करत दिली आहे. यासोबतच एसटी महामंडळ बसगाड्यांच्या पुनर्बांधणी आणि पुन:स्थितीकरणासाठी ३९ कोटी रुपये आज महामंडळाला वितरित करण्यात आले असून या निधीतून एसटीच्या ३०० बसगाड्यांची पहिल्या टप्प्यात पुनर्बांधणी करण्यात येणार असल्याचेही अजित पवार म्हणाले आहेत.
सद्यस्थितीत योजनेंतर्गत महामंडळातर्फे ८७२ बसगाड्या चालवण्यात येतात. २०११ ते २०१३ या कालावधीत टप्प्याटप्प्यानं प्राप्त झालेल्या, अल्युमिनियम धातूत बांधलेल्या ६२५ बसेसपैकी ज्यांची बांधणी नादुरुस्त स्थितीत आहे अशा ३०० वाहनांची पहिल्या टप्प्यात पुनर्बांधणी,पुन:स्थितीकरण करण्यात येईल. एसटी महामंडळाच्या कार्यशाळेत प्रतिवाहन १३ लाख रुपये खर्च करून बसगाड्यांच्या पुन:स्थितीकरणाचे काम करण्यात येणार आहे. राज्य शासनानं ३९ कोटी रुपयांचा निधी वितरित केल्यानं ग्रामीण भागातील नागरिकांना विशेष करून विद्यार्थींनींचा एसटी प्रवास अधिक सुलभ व सुरक्षित होण्यास मदत होणार असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
“पाकीटमारीत तर तुमची PHD असेल”, संजय राऊतांच्या टीकेवर निलेश राणेंचे प्रत्युत्तर
मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून प्रत्येक दिवस ‘April Fool’s Day’; काँग्रेसचा टोला
अभिनेत्री जेनीलिया देशमुखचे पुन्हा सिनेसृष्टीत पदार्पण ‘या’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला
IPL 2022: CSK vs LSG सामन्यात धोनीने रचला नवा इतिहास; रोहित – विराटलाही मागे सोडले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
