Share

April Fool’s Day : कधीपासून साजरा केला जातो ‘एप्रिल फुल डे’? जाणून घ्या सविस्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दरवर्षी १ एप्रिल हा दिवस जगभरात ‘एप्रिल फुल डे’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना मूर्ख बनवत असतो. लहान असो किंवा मोठा सर्वच जण एकमेकांना विविध युक्त्या लढवून या दिवशी एप्रिलफुल बनवतात. परंतु, आपण हा दिवस का साजरा करतो?, कधीपासून साजरा करतो?, या दिवसा मागचा इतिहास काय? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अजूनही माहित नाहीत. चला तर मग जाणून घेऊया या ‘एप्रिल फुल डे’ संदर्भात सविस्तर माहिती.

…तेव्हापासून झाली ‘एप्रिल फुल डे’ साजरा करण्यास सुरुवात

मिळालेल्या माहितीनुसार इंग्लंडचा राजा रिचर्ड द्वितीय आणि बोहेमियाची राणी अॅनी यांनी ३२ मार्च १३८१ रोजी त्यांच्या लग्नाची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर जनतेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. परंतु, ३२ मार्च ही तारीख नसतेच. राजा-राणींनी केवळ जनतेला मूर्ख बनवले होते. तेव्हापासून हा दिवस ‘एप्रिल फुल डे’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.

१९ व्या शतकात भारतात झाली ‘एप्रिल फुल डे’ साजरा करण्यास सुरुवात

काही अहवालांनुसार हा दिवस भारतामध्ये ब्रिटिशांनी १९ व्या शतकात साजरा करण्यास सुरुवात केली. मागील काही वर्षांमध्ये हा दिवस साजरा करण्याची क्रेझ वाढली असून सोशल मीडियावर त्याच्याशी संबंधित मीम्स आणि जोक्सही दरवर्षी व्हायरल होतात.

दरम्यान, ‘एप्रिल फुल डे’ वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटनमध्ये ‘एप्रिल फुल डे’ फक्त दुपारपर्यंत साजरा केला जातो. तर जपान, रशिया, आयर्लंड, इटली आणि ब्राझीलमध्ये संपूर्ण दिवस एप्रिल फूल म्हणून साजरा केला जातो.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!