🕒 1 min read
मुंबई : महिला विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा १३७ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. अंतिम फेरीत इंग्लंडचा सामना ऑस्ट्रेलियन संघाशी होणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंड संघाने निर्धारित ५० षटकांत आठ गडी गमावून २९३ धावा केल्या. इंग्लंडकडून सलामीवीर डॅनियल वॉटने १२५ धावांची आकर्षक खेळी खेळली. या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ ३८ षटकांत १५६ धावांत सर्वबाद झाला. इंग्लंडकडून सोफी अॅलेक्सटनने जबरदस्त गोलंदाजी करताना ३८ धावांत ६ बळी घेतले.
न्यूझीलंडमधील ख्राइस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची कर्णधार सुने लुसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिचा हा निर्णय वेगवान गोलंदाज मारिजाने कॅपने योग्य ठरवला. इंग्लंड संघाला पहिला धक्का १० धावांच्या स्कोअरवर बसला. इंग्लंडची स्टार फलंदाज टॅमी ब्युमाँट अवघ्या ७ धावा करून बाद झाली. डॅनियल वॅटने एक बाजू सावरली. तिने १२५ चेंडूत १२ चौकारांच्या मदतीने १२९ धावांची खेळी खेळली. कर्णधार हीथर नाईट फार काही करू शकली नाही आणि एक धावा करून बाद झाली. ब्युमाँटशिवाय सोफिया डंकलेनेही ६० धावा केल्या.
प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि ४४ धावांमध्ये त्यांनी आघाडीचे तीन फलंदाज गमावले. त्यानंतर वेळोवेळी दक्षिण आफ्रिकेच्या विकेट पडत राहिल्या आणि संपूर्ण संघ १५६ धावांवर सर्वबाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
- “अलीकडच्या काळात विकासाचे मुद्दे सोडून बाकी सर्व मुद्द्यांवर चर्चा होतेय”, अजित पवारांचा प्रसाद लाड यांना टोला
- कोरोनाची नियमावली आणखी शिथिल होणार; उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
- माझी बदनामी करू नको; संजय दत्त यशला असं का म्हणाला?
- “…या प्रवृत्तीमुळे जनता तुम्हाला चपलेकडे देखील उभी करत नाही”, चित्रा वाघ यांचा नाना पटोलेंना टोला
- IPL 2022: शेल्डन जॅक्सनची कॅच बघून रैनाला आठवला गिलक्रिस्ट ; VIDEO व्हायरल
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
