🕒 1 min read
मुंबई: देशातील वाढती महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे रोज सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. इंधनाच्या किंमती दररोज वाढत असल्याचे चित्र देशात निर्माण झाले आहे. वाढत्या महागाईच्या मुद्यावरुन काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole ) यांनी ट्वीट करत आम्ही देश वाचविण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू. असे म्हटले आहे. मात्र यावरच भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे.
“मोदींच्या राष्ट्रविरोधी आणि समाजविरोधी धोरणांविरुद्ध…” तुमच्या या असल्या सडक्या आणि द्वेषमूलक प्रवृत्तीमुळे जनता तुम्हाला चपलेकडे देखील उभी करत नाही. अशी खोचक टीका चित्रा वाघ यांनी ट्वीट केली आहे. “मोदींच्या राष्ट्रविरोधी आणि समाजविरोधी धोरणांविरुद्ध आवाज उठविणाऱ्याचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करेल, असा संदेश दिला जात आहे. पण आम्ही देश वाचविण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू.”, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
दरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आज (३१ मार्च) संसदेच्या आवारामध्ये काँग्रेसने महागाईविरोधात आंदोलन केले.यावेळी काँग्रेसच्या खासदारांनी एका बाईकला हार घालून प्रतिकात्मक पद्धतीने निषेध केला.राहुल गांधी यांनीही बाईकला हार घालत आपला निषेध व्यक्त केला.यावेळी गॅसची दरवाढ मागे घ्या, गरिबांना लुटणं बंद करा, महागाई वाढवणं बंद करा, मोदी सरकार हाय हाय, तानाशाही नही चलेगी अशा घोषणाही देण्यात आल्या.
महत्वाच्या बातम्या:
मिथिला पालकरवर दुःखाचा डोंगर; तिच्या सर्वात जवळच्या व्यक्तीचं निधन
IPL 2022: दिल्लीच्या खेळाडूने दाखवला कॅप्टन ऋषभवर विश्वास; म्हणाला ‘तो यंदा पहिले जेतेपद मिळवेल…’
खताचे संकट टाळण्यासाठी कृषी विभागाचा पुढाकार!
IPL 2022 : गुणतालिकेत कोण कुठल्या स्थानी?, पर्पल-ऑरेंज कॅप कुणाकडं? वाचा सर्व एका क्लिकवर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
