🕒 1 min read
पुणे: अलीकडच्या काळात विकासाचे मुद्दे सोडून बाकीच्या मुद्द्यांवर बरीच चर्चा केली जात असल्याची खंत उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी आज प्रदेश कार्यालयात माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केली. तसेच भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केलेल्या मशिदींवर लाऊडस्पीकर लावण्यावर बंदी आणण्याच्या मागणीवरदेखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“कुणी कुठला मुद्दा घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे. सरकार कुठलंही असो सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट जे सांगेल त्याची अंमलबजावणी सरकारला करावी लागते आणि मुद्दा पटला नाही तर अपीलही करावे लागते. कोर्टाने काय निर्णय दिला आहे तो वाचला नाही मात्र त्याची माहिती घेऊन कोर्टाचा अवमान होणार नाही असा निर्णय घेतला जाईल.”, असे अजित पवार म्हणाले आहेत.
जातीय सलोखा राहण्याच्या दृष्टीने सर्व राजकीय पक्षांनी प्रयत्न केला पाहिजे. पक्षाच्या नेत्यांनीही तीच भूमिका मांडण्याचं काम केलं पाहिजे.यंदाच्या १५ ऑगस्टला देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृत महोत्सव साजरा होत आहेत. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होत असताना जग कुठला विचार करतंय आणि आपण कुठल्या विषयांमध्ये जनतेला गुंतवून ठेवतोय आणि कुठल्या विषयाला महत्त्व देतोय याचं आत्मपरीक्षण, आत्मचिंतन झालं पाहिजे. सोबतच जनतेनेही या विषयाचा फार गंभीरपणे विचार करण्याची गरज असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
देशासाठी माझा जीवही हाजीर पण अशी गुंडगिरी…”, भाजप गुंडांच्या हल्ल्यानंतर केजरीवालांची प्रतिक्रिया
“आपचा बाप शिवसेना आहे”- प्रसाद लाड
मिथिला पालकरवर दुःखाचा डोंगर; तिच्या सर्वात जवळच्या व्यक्तीचं निधन
IPL 2022: दिल्लीच्या खेळाडूने दाखवला कॅप्टन ऋषभवर विश्वास; म्हणाला ‘तो यंदा पहिले जेतेपद मिळवेल…’
खताचे संकट टाळण्यासाठी कृषी विभागाचा पुढाकार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
