Share

माझी बदनामी करू नको; संजय दत्त यशला असं का म्हणाला?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : साउथचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘केजीएफ-२’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. हा चित्रपट १४ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.ट्रेलर लाँचमध्ये संजय दत्तने या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे बरेच किस्से सांगितले.

यश म्हणजेच केजीएफच्या रॉकी भाईने संजय दत्तची प्रशंसा केली. तो म्हणाला की, ‘तब्येत खराब असताना देखील संजय दत्त यांनी या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. यामधून त्यांचे कामाप्रती निष्ठा दिसते. बऱ्याच जणांना माहित आहे की, कशाप्रकारे त्यांनी अॅक्शन सीक्वेन्सचे चित्रीकरण केले. मी अॅक्शन सीनमुळे खूप घाबरलो होतो. मी सर्वांना सावध राहायला सांगितले होते. तेव्हा संजय दत्त माझ्या जवळ आले आणि म्हणाले की, यश, कृपया माझी बदनामी करू नको. मी हे शूटिंग करणार आहे आणि मला हे करायचे आहे. मी बेस्ट काम करेन.’

पुढे यशने सांगितले की, ‘संजय सर हे एक योद्धा आहेत.’ ‘केजीएफ-२’ च्या शूटिंग दरम्यान संजय दत्त कॅन्सर या आजाराचा सामना करत होते. पण तरी देखील त्याने या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. केजीएफ चॅप्टर-१ चित्रपट २०१८ साली रिलीज झाला. आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग भेटीला येतो आहे. हिंदी बरोबरच तेलगु, तमिळ आणि मल्याळम या भाषेमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

देशासाठी माझा जीवही हाजीर पण अशी गुंडगिरी…”, भाजप गुंडांच्या हल्ल्यानंतर केजरीवालांची प्रतिक्रिया
“आपचा बाप शिवसेना आहे”- प्रसाद लाड
मिथिला पालकरवर दुःखाचा डोंगर; तिच्या सर्वात जवळच्या व्यक्तीचं निधन
IPL 2022: दिल्लीच्या खेळाडूने दाखवला कॅप्टन ऋषभवर विश्वास; म्हणाला ‘तो यंदा पहिले जेतेपद मिळवेल…’
खताचे संकट टाळण्यासाठी कृषी विभागाचा पुढाकार!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!