Share

…ते हेच करत राहणार, आपण लढत राहायचे- उद्धव ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ईडीने पुष्पक ग्रुपच्या (ED action taken against Pushpak Group) ६ कोटी ४५ लाख रुपयांच्या मालमत्तेची चौकशी केली आहे. त्यात रश्मी ठाकरे यांचे सख्खे भाऊ तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Sridhar Patankar) यांच्या ठाण्यातील नीलंबरी प्रकल्पातील ११ सदनिकांना टाळे ठोकण्यात आले आहे. याचे पडसाद बुधवारी (२३ मार्च) मंत्रिमंडळ बैठकीत उमटले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी कारवाईसंदर्भात विचारणा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी बोलत असतांना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की,‘ते हेच करत राहणार, आपण लढत राहायचे.’ तसेच केंद्राचे सुडाचे राजकारण थांबतच नाही. ‘ईडी’च्या कारवाया वाढतच चालल्या आहेत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी १५ फेब्रुवारी रोजी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत म्हटले हते की, ‘महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी तपास यंत्रणांच्या धाडी सुरुच राहतील. एवढ्यावरच हे प्रकरण थांबणार नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ठाकरे कुटुंब आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर देखील ईडीच्या धाडी पडतील’, त्यामुळे संजय राऊत यांनी केलेले भाकीत सत्यात उतरले असल्याचे म्हटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!