Share

भाजपला लवकरच ‘हे राम’ म्हणावे लागेल; उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यावरील कारवाईनंतर राऊतांचा गंभीर इशारा 

Published On: 

🕒 1 min read

नागपूर: ईडीने पुष्पक ग्रुपच्या (ED action taken against Pushpak Group) ६ कोटी ४५ लाख रुपयांच्या मालमत्तेची चौकशी केली आहे. त्यात रश्मी ठाकरे यांचे सख्खे भाऊ तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर  (Sridhar Patankar) यांच्या ठाण्यातील नीलंबरी प्रकल्पातील ११ सदनिकांना टाळे ठोकण्यात आले आहे. यावर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत असतानाच आता शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut ) यांनी गंभीर इशारा दिला आहे.

भाजपला ज्यांच्यामागे जायचं आहे, त्यांनी जावं पण त्यांना मात्र स्मशानातच जावं लागणार आहे. भाजपने कोणाच्याही मागे ईडीच्या कारवाया लावल्या तरी त्यांची लाकडं ही राजकीय स्मशानात रचली गेली आहेत. त्यांना लवकरच ‘हे राम’ म्हणावं लागेल. असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.

तसेच श्रीधर पाटणकारांना चौकशीसाठी बोलवायला पाहिजे. त्यांना मालमत्ता जप्त करण्यापूर्वी चौकशीला का नाही बोलवलं?  भाजपची ही मनमानी आहे भाजप याचं समर्थन करत असून ही हुकूमशाहीची नांदी आहे. असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. तसेच कालपासून शिवसंपर्क अभियान विदर्भ आणि मराठवाड्यात सुरु झाले. या कार्यक्रमाने वेग घेतला आणि तितक्यात या कारवाया सुरु झाल्या. त्यामुळे शिवसंपर्क अभियानाचे यश बघून लक्ष विचलित करण्यासाठी या कारवाया केल्या जात असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!