Share

“आता मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही”, जितेंद्र आव्हाडांचे मोठे वक्तव्य

Published On: 

मुंबई: राज्यात महाविकास आघाडी मधील नेते आणि त्यांच्या कुटुंबियांवर ईडीचे धाडसत्र सुरूच आहे. आताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. मात्र या कारवाईचा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी चांगलाच धसका घेतल्याचे दिसते. त्यांनी म्हटले आहे की, “उद्या ‘ईडी’ने माझ्या मुलीला चौकशीला बोलावले तर ती आत्महत्या करेल तसेच महाविकास आघाडी घ्यायचा तो निर्णय घेईल पण मला विचाराल तर आता मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही.” त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपने त्यांना निशाण्यावर धरले आहे.

राज्य सरकारकडून भाजप नेत्यांची चौकशी सुरु असली तरी कोणालाही तुरुंगात टाकले आहे का? चौकशी करणे आणि धाडी टाकणे यामध्ये फरक आहे. पण आता केंद्रीय यंत्रणा थेट घरात घुसल्या आहेत. यावर महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते चर्चा करतील. पण मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

दरम्यान ईडीने पुष्पक ग्रुपच्या (ED action taken against Pushpak Group) ६ कोटी ४५ लाख रुपयांच्या मालमत्तेची चौकशी केली आहे. त्यात रश्मी ठाकरे यांचे सख्खे भाऊ तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर  (Sridhar Patankar) यांच्या ठाण्यातील नीलंबरी प्रकल्पातील ११ सदनिकांना टाळे ठोकण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (२३ मार्च) सकाळी ११ वाजता राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मविआ कोणते पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!