Share

IPL 2022 : सुपरच..! केएल राहुलच्या लखनऊ संघानं लाँच केली आपली पहिलीवहिली जर्सी

Published On: 

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) १५व्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी, नवीन संघ लखनऊ सुपर जायंट्सची जर्सी लाँच करण्यात आली. लीगचा पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात २६ मार्च रोजी होणार आहे. लखनऊ संघ हा दोन नवीन संघांपैकी एक आहे त्यांनी आपली आयपीएल जर्सी लाँच केली आहे.

आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळणाऱ्या लखनऊ संघाच्या नवीन जर्सीत फिकट आकाश रंगाचा वापर करण्यात आला आहे. युवा डिझायनर कुणाल रावलने ही जर्सी डिझाइन केली आहे. या संघाचे थीम साँग बादशाहने गायले आहे आणि कोरिओग्राफी रेमो डिसूझाने केली आहे.

या प्रसंगी बोलताना, लखनऊ सुपरजायंट्सचे मालक संजीव गोयंका यांनी संघाच्या फिकट आकाश रंगाच्या जर्सीवर ‘गरुड’ चिन्हाचा उल्लेख केला आणि सांगितले की त्यांची फ्रेंचायझी ‘उडण्यासाठी तयार’ आहे. योग्य गोष्टींसाठी योग्य लोकांची निवड करण्यावर यश अवलंबून असते, असे ते म्हणाले.

भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर हा या संघाचा मेंटॉर आहे. त्याचबरोबर संघाची कमान केएल राहुलच्या हाती आहे. लखनऊ सुपर जायंट्सला २८ मार्च रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. आवेश खानच्या रूपाने संघाने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू विकत घेतला. त्याचबरोबर या संघाने जेसन होल्डर, एविन लुईस आणि क्विंटन डी कॉक यांसारख्या बड्या खेळाडूंवरही बोली लावली.

महत्त्वाच्या बातम्या –

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!