🕒 1 min read
मुंबई : भारताने महिला विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा उंचावल्या आहेत. आज मंगळवारी रंगलेल्या सहाव्या साखळी सामन्यात भारताने बांगलादेशचा ११० धावांनी पराभव केला. सहा सामन्यांमधला भारताचा हा तिसरा विजय आहे. भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी २३० धावांचे लक्ष्य ठेवले होते. यानंतर भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत बांगलादेशचा डाव केवळ ११९ धावांत गुंडाळला. भारताचे आता सहा गुण झाले आहेत.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शफाली वर्माने ४२ आणि यास्तिका भाटियाने ५० धावांचे योगदान दिले. या दोघांमुळे टीम इंडियाला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. यास्तिकाचे या स्पर्धेतील सलग दुसरे अर्धशतक होते. तिला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. बांगलादेशची मध्यमगती गोलंदाज रितू मोनीने अप्रतिम कामगिरी करत अवघ्या ३७ धावांत ३ बळी घेतले. त्याच्याशिवाय नाहिदा अख्तरला २ आणि जहांआरा आलमला एक बळी मिळाला.
.@YastikaBhatia notched up her second half-century in the #CWC22 & bagged the Player of the Match award as #TeamIndia beat Bangladesh. ???? ???? #INDvBAN
Scorecard ▶️ https://t.co/ZOTtBWYPMe pic.twitter.com/rjMactEHZd
— BCCI Women (@BCCIWomen) March 22, 2022
प्रत्युत्तरात बांगलादेशचा डाव ४०.३ षटकात ११९ धावांवर संपुष्टात आला. सलमा खातूनव्यतिरिक्त (३२) एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर तग धरता आला नाही. भारताची गोलंदाज स्नेह राणाने ३० धावांत ४ बळी घेत बांगलादेशच्या डावाला सुरुंग लावला. झुलन गोस्वामी आणि पुजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
???????????? ???????????? ???????????? ????????????????????#TeamIndia bowlers have been fantastic tonight. They have bowled out Bangladesh for 119 to register a convincing 110 runs victory. #CWC22 | #INDvBAN
Details▶️ https://t.co/ZOTtBWYhWG pic.twitter.com/OX52iquPQC
— BCCI Women (@BCCIWomen) March 22, 2022
गुणतालिकेत १२ गुणांसह ऑस्ट्रेलिया प्रथम स्थानी आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेचे ८ गुण आहेत. चौथ्या क्रमांकावर असलेल्या विंडीज संघाचेही ६ गुण आहेत, मात्र नेट रनरेटमुळे ते भारतापेक्षा मागे आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
