🕒 1 min read
मुंबई: क्रिकेटची विश्वासार्हता खेळाच्या रोमांचक ऍक्शन आणि निष्पक्ष निकालांमुळे आहे. मैदानात बॉल आणि बॅटचा सामना पाहण्यासाठी प्रत्येक क्रिकेटप्रेमी उत्सुक असतो. विशेषत: सामना विश्वचषक उपांत्य फेरीचा असेल, तर प्रेक्षकांच्या क्रेझचा अंदाज बांधणे कठीण आहे. विश्वचषकाच्या मोठ्या सामन्यात खेळाडूही जोर लावून मैदानात उतरतात. मात्र या मोठ्या मंचावर एखाद्या विशेष नियमामुळे एखाद्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले तर प्रेक्षक आणि खेळाडूंची हिरमोड होते. असेच काहीसे आजच्याच दिवशी ३० वर्षांपूर्वी ICC विश्वचषक १९९२ च्या उपांत्य फेरीत पाहायला मिळाले होते. या सामन्यात इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने होते.
१९९२ च्या विश्वचषकातील इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीचा सामना क्वचितच कोणताही क्रिकेटप्रेमी विसरला असेल. दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड (ENG vs SA) सामन्याचा निकाल अशा रीतीने लागला की सर्वांनाच धक्का बसला आणि सगळेजण अस्वस्थ झाले. प्रत्यक्षात हा सामना पावसामुळे थांबवावा लागला होता. पावसापूर्वी दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी १३ चेंडूत २२ धावा करायच्या होत्या. मात्र पाऊस थांबल्यानंतर पुन्हा सामना सुरू झाला तेव्हा दक्षिण आफ्रिकेला २१ धावा करण्यासाठी फक्त १ चेंडू देण्यात आला. हे पाहून कोणाचाही विश्वास बसत नव्हता, कारण १ चेंडूत २१ धावा करणे अशक्य होते.
Today in 1992: This happens in #WorldCup at Sydney (Match between Eng vs SA) @rajeshstats @samiprajguru @aajtak pic.twitter.com/uGFhfacH6H
— Dilip Singh (@Statsdilip) March 22, 2015
१९९२ च्या विश्वचषकात आयसीसीने मोस्ट प्रोडक्टिव षटकांचा नियम लागू केला होता. या नियमानुसार प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने षटकात सर्वात कमी धावा केल्या तर दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या लक्ष्यातून तेवढ्याच धावा वजा केल्या जातात. इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात, सामना १२ मिनिटे थांबवण्यात आला आणि २ षटके कमी करण्यात आली. मात्र धावसंख्येमध्ये केवळ . या अर्थाने दक्षिण आफ्रिकेला १ चेंडूत २१ धावा करण्याचे अशक्यप्राय लक्ष्य मिळाले. इतिहासातील सर्वात दुर्दैवी संघ मानला जाणारा दक्षिण आफ्रिका १९९२ च्या विश्वचषकात वर्णद्वेषाच्या धोरणांमुळे २२ वर्षांच्या बंदीनंतर परतला. अशा परिस्थितीत,उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याचा अशा प्रकारे पराभव होणे संघातील खेळाडूंसाठी हृदयद्रावक होते.
महत्वाच्या बातम्या
- …तर विरोधकांच्या शेतीवर नांगर फिरवण्याची वेळ येईल- संजय दौंड
- मुक्ता बर्वे ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री! ‘या’ सिनेमातील कामाचा झी मराठीकडून गौरव
- मत्स्यपालन करून मिळवा दुहेरी फायदा; उत्पन्नामध्ये होईल दुप्पट वाढ
- IPL 2022 : चाहत्यांसाठी खुशखबर..! यंदाच्या हंगामात सुरेश रैनाची होणार एन्ट्री; वाचा सविस्तर
- Women’s WC 2022: स्नेह राणाला आऊट केल्यानंतर बांगलादेशी खेळाडूचे ‘असे’ सेलिब्रेशन; व्हिडीओ व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
