Share

भाजप-सेना पुन्हा एकत्र येणे अशक्य; संजय राऊतांचे स्पष्टीकरण

Published On: 

🕒 1 min read

नागपूर: शिवसेना खासदार संजय राऊत आज (२२ मार्च) नागपूर दौऱ्यावर आहेत. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानास आजपासून सुरुवात होणार आहे. यात शिवसेनेचे सर्व खासदार विदर्भ आणि मराठवाडा दौरा करणार आहेत. त्यासाठीच संजय राऊत (Sanjay Raut ) नागपूर मध्ये पोहोचले आहेत. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

भविष्यात  शिवसेना-भाजप (shivsena-bjp) एकत्र येणार नाही. एखादी भूमिका घेतली की त्यावरून शिवसेना मागे येणार नाही. ज्या पद्धतीनं २५ वर्ष एकत्र काम केलं. ते विसरुन भाजप सूडानं वागतंय. त्यामुळे एकत्र येणं शक्य नाही. असे संजय राऊत  यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना-भाजप युती होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान यावेळी त्यांनी किमान समान कार्यक्रमावर राज्यात सरकार बनले असून कुणीही आपला पक्ष इतर पक्षात विलीन केला नाही. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे. महाविकास आघाडीने एकत्र मनपा निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा आहे. पण तसे झाले नाही, तर आम्ही स्वबळावर लढू. असेही राऊत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!