Share

मुक्ता बर्वे ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री! ‘या’ सिनेमातील कामाचा झी मराठीकडून गौरव

Published On: 

मुंबई : यंदाचा झी गौरव पुरस्कार अगदी दिमाखदारपणे संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात गेल्या 21 वर्षातल्या, 21 महत्वाच्या चित्रपटांचा गौरव करण्यात आला. यंदाच्या महागौरव सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान पटकावला अभिनेत्री मुक्ता बर्वेने जोगवा या चित्रपटासाठी मुक्ता बर्वे हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा कपूर हिच्या हस्ते मिळाला.

https://www.instagram.com/p/Ca7wA5OMVTY/?utm_source=ig_web_copy_link

पुरस्कार मिळाल्यानंतर मुक्ताने आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, ‘झी महागौरवचा पुरस्कार मिळाल्यामुळे मला खूप छान वाटलं. तो दिवसच खूप छान होता. मला ती संकल्पनाच खूप आवडली. झी गौरवच एकविसावं वर्ष. माझ्या करियरला आता 20 वर्ष झालं. तसेच करिष्मा कपूरच्या हस्ते पुरस्कार मिळाला याचा पण आनंद आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर मी सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यावर फॅन्सनी खूप कौतुक केलं. काहींनी कौतुक करताना ‘निर्विवाद होतं’ अशी कमेंट देखील केली. पण मला स्वतःला निर्विवाद वाटत नाही. कारण अनेक अभिनेत्रींनी उत्तम कामं केली. 21 वर्षात ज्या अभिनेत्रींना पुरस्कार मिळाले त्या उत्तमच आहेत. त्यामुळे माझी पुरस्कारासाठी निवड होणं निर्विवाद होतं असं मी म्हणणार नाही पण माझी निवड झाली याचा मला प्रचंड आनंद आहे.”

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!