🕒 1 min read
मुंबई: राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (२१ मार्च) विधानसभेत धान उत्पादक शेतकऱ्यांबद्दल मोठी माहिती दिली आहे. शेतकऱ्याच्या नावाने मिळणारी रक्कम ही शेतकऱ्याच्या हातातच जावी यासाठी बोनसऐवजी शेतकऱ्याला प्रति एकर मदत करता येईल का? याचा राज्य सरकार विचार करत असल्याचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज विधानसभेत सांगितले.
तसेच धान उत्पादकांचे थकीत असलेले ६०० कोटी तात्काळ देण्यात येतील, अशी घोषणाही अजितदादांनी केली. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी याबाबतचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता. शासनाने धान खरेदी सुरु केली आहे. शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळत आहे. मात्र यावर्षीचा बोनस मिळालेला नाही. तो बोनस द्यावा, अशी मागणी वैभव नाईक यांनी केली.
शेतकऱ्याच्या नावाने मिळणारी रक्कम ही शेतकऱ्याच्या हातातच जावी यासाठी बोनसऐवजी शेतकऱ्याला प्रति एकर मदत करता येईल का? याचा राज्य सरकार विचार करत असल्याचे अर्थमंत्री ना. @AjitPawarSpeaks यांनी आज विधानसभेत सांगितले. https://t.co/lLbhLNzrqm
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) March 21, 2022
तसेच भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी २०१३ पासून सुरु केलेली बोनस देण्याची पद्धत सुरु ठेवावी, असे सांगितले. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, शेतकऱ्यांना बोनस न देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बोनसऐवजी शेतकऱ्यांनी जितक्या क्षेत्रावर धान उत्पादन केले, त्यानुसार त्याला मदत करता येते का? याची चाचपणी सुरू केली आहे.मध्य प्रदेश, छत्तीसगढसारख्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे, हे तपासले जाईल. कारण आपण बोनस जाहीर केल्यानंतर शेजारच्या राज्यातील माल आपल्याकडे येतो आणि ते देखील बोनस मागतात. तसेच राज्यात देखील बोनस वाटताना तो शेतकऱ्यांना न मिळता मधले व्यापारी त्यात घोटाळा करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति एकरी मदत देण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- १११ मिनिटे केवळ धावांचा पाऊस; २० वर्षीय खेळाडूने रचला नवीन इतिहास!
- ‘सामी सामी’ गाण्याचं मराठमोळ व्हर्जन आलं समोर, व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल..
- शिवजयंतीवरून मनसे राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक वाद!
- VIDEO : फायर है मै..! IPL 2022पूर्वी डेल स्टेननं केलं ‘पुष्पा’ स्टाइल सेलिब्रेशन; तुम्हीच पाहा!
- ‘द महाराष्ट्र फाईल्स’ बनवण्याची बॉलिवूडमध्ये कुणात हिंमत आहे का?; मोहित कंबोज यांचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
