🕒 1 min read
मुंबई : आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एक मोठी मोठी घोषणा केली आहे. एमआयएमवर वारंवार आरोप केला जातो की आमच्यामुळे भाजपा जिंकून येते. तुम्हालाही भाजपला हरवायचे आहे आणि आमचेही उद्दिष्ट हेच आहे, त्यामुळे आता आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. असे जलील यांनी म्हटले आहे, यावरच आता भाजप नेते नितेश राणे यांनी ट्वीट करत मविआ सरकारवर निशाणा साधला आहे.
“वाह AIMIM ची महाविकास आघाडी मध्ये येण्याची तयारी, कट्टरपंथीना पण शिवसेना आपलीशी वाटायला लागली आहे. आता फक्त ISIS चा प्रस्ताव येणे बाकी आहे. खरंच, करून दाखवलं.”, असा टोला त्यांनी ट्वीट करत लगावला आहे.
वाह.. AIMIM ची महाविकास आघाडी मध्ये येण्याची तयारी..
कट्टरपंथीना पण शिवसेना आपलीशी वाटायला लागली आहे..
आता फक्त ISIS चा प्रस्ताव येणे बाकी आहे..
खरंच, करून दाखवलं!!— Nitesh Rane (@NiteshNRane) March 19, 2022
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत माझी एक बैठक झाली असून तेव्हा आम्हीच त्यांना प्रस्ताव दिला की, एमआयएम काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्यास तयार आहे. आम्ही ते काय करतात ते पाहू, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.
स्वतःला सेक्युलर मानणाऱ्या या पक्षांनी शिवसेनेची साथ दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधात उभे राहण्यासाठीच शिवसेनेचा जन्म झाला होता. त्यामुळे आता आम्हीही त्यांना प्रस्ताव दिला असून भविष्यात यांनी आमच्यावर आरोप करण्यापूर्वी विचार केला पाहिजे. भाजपला दूर राहण्यासाठी एमआयएम कुणासोबतही जाण्यास तयार आहे, असेही जलील यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
