🕒 1 min read
नवी दिल्ली : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित आ ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांसारखे प्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. नुकतंच या चित्रपटाच्या टीमने केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
आज #TheKashmirFiles की टीम के साथ भेंट की।
अपने ही देश में अपना घर छोड़ने को मजबूर हुए कश्मीरी पंडितों के बलिदान, असहनीय पीड़ा और संघर्ष की सच्चाई इस फिल्म के माध्यम से पूरी दुनिया के सामने आई है, जो एक बहुत ही प्रशंसनीय प्रयास है। pic.twitter.com/Lt2OLB2sVm
— Amit Shah (@AmitShah) March 16, 2022
अमित शाह यांनी नुकतंच याबाबतचे काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी अमित शाह म्हणाले, “आज कश्मीर फाइल्स या चित्रपटाच्या टीमची भेट घेतली. या चित्रपटाच्या माध्यमातून काश्मिरी पंडितांचा त्याग, त्यांना झालेल्या असह्य वेदना आणि त्यांच्याच देशात त्यांना घर सोडून जावे लागले त्या संघर्षाचे सत्य संपूर्ण जगासमोर आलं आहे. हा एक अतिशय स्तुत्य प्रयत्न आहे
View this post on Instagram
“द कश्मीर फाइल्स” हे सत्याचे धाडसी प्रतिनिधित्व आहे. यामुळे या अशा ऐतिहासिक चुकांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी समाज आणि देशाला जागृत करण्याचे काम करेल. हा चित्रपट बनवल्याबद्दल मी या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो”, असे अमित शाह म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
