Share

फडणवीसांच्या दाव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया; म्हणाले, “चार राज्यात सत्ता आली असली तरी…”

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : पाच राज्यांच्या निवडणूक निकालात पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त झाला. दरम्यान,गोव्यातील भाजपच्या विजयाचे शिल्पकार विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे मुंबईत जल्लोषात स्वागत झाल्यानंतर १७ मार्च रोजी ते नागपूरमध्ये दाखल झाले. यावेळी बोलत असतांना महाराष्ट्रात २०२४ ला पूर्ण बहुमताचं भाजप सरकार पहायला मिळेल, असा दावा फडणवीसांनी केला. दरम्यान, फडणवीसांच्या या वक्तव्यावर आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना छगन भुजबळ म्हणाले की,‘चार राज्यात सत्ता जरी आली असली तरी त्यांचे उत्तर प्रदेशमध्ये ५० पेक्षा जास्त आमदार कमी झालेले आहेत.’ तसेच त्यांना असे म्हणायला काहीच हरकत नाही. परंतु त्यासाठी देखील त्यांना सव्वा दोन वर्षे थांबावे लागेल. जेव्हा निवडणुका होतील तेव्हाच सरकार येईल ना? मात्र आता तरी सध्या तसे चित्र दिसत नाही, असेही भुजबळ म्हणाले.

दरम्यान, गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूरमध्ये मिळालेला विजय हा मोदींच्या कामाला लोकांनी दिलेली पावती आहे. महाराष्ट्रातही तीच स्थिती आहे.तसेच राजकारणात काहीही होऊ शकतं. पण मी काही म्हटलं तर लगेच सरकार पडणार अशा चर्चा सुरु होतात,असेही फडणवीस यावेळी म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!