Share

IPL 2022: T20 वर्ल्डकपमध्ये जागा बनवण्यासाठी, शमीसमोर बीसीसीआयाची मोठी अट!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. कसोटी क्रिकेटमध्येही तो धुव्वादार गोलंदाजी करतो. लाल चेंडूतून त्याला जितका स्विंग मिळतो, तो स्विंग क्वचितच इतर कुणाला मिळत असेल. एकेकाळी ‘स्विंग का सरताज’ मानल्या जाणाऱ्या  शमीला पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये आता पहिली पसंती राहिलेली नाही. हेच कारण असावे की बीसीसीआयने त्याच्यापुढे एक मोठी अट ठेवली आहे.

ICC T20 वर्ल्डकपनंतर मोहम्मद शमीची पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेट फॉरमॅटमध्ये निवड झाली नव्हती. त्यामुळे जर शमीला (Mohmmad shami) २०२२ च्या T-20 वर्ल्डकप संघात स्थान मिळवायचे असेल तर त्याला आगामी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल अन्यथा वर्ल्ड कपमधून त्याचा पत्ता साफ होऊ शकतो. बीसीसीआयच्या (BCCI) सूत्रांनी सांगितले की, “प्रत्येक गोलंदाजाला प्रत्येक फॉरमॅटमध्ये खेळू देता येत नाही. जसप्रीत बुमराह हा एकमेव गोलंदाज आहे जो प्रत्येक फॉरमॅटमध्ये फिट बसतो. हे संघ व्यवस्थापन खेळाडूंना स्पष्टपणे सांगते आणि शमीलाही हे सांगितले आहे.”

कसोटीत अप्रतिम कामगिरी असलेल्या शमीचा T20 मध्ये खराब रेकॉर्ड आहे. ज्यामुळे बीसीसीआय त्याचे आकलन आयपीएल वरून करेल. त्याचे टीम इंडियातील स्थान आयपीएलमधील प्रदर्शनावर ठरवण्यात येईल. आयपीएलमध्ये शमी नवीन आयपीएल संघ गुजरात टायटन्सकडून खेळताना दिसणार आहे. स्पर्धा २६ मार्चपासून सुरू होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!