चंदीगढ: आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान यांनी आज पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आपच्या अनेक बड्या नेत्यांची उपस्थिती होती. भगवंत मान हे पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री बनले आहेत. पंजाबच्या इतिहासामध्ये प्रथमच पारंपरिक पक्षांना सोडून एक नवा पक्ष सत्तेत आला आहे. त्यामुळे पंजाबच्या जनतेमध्ये देखील मान यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठी उत्सुकता दिसून आली आहे.
भगवंत मान यांचा शपथविधी स्वातंत्र सैनिक भगत सिंह यांचे मूळ गाव असलेल्या खटकर कलां या गावात झाला. यावेळी बोलताना भगवंत मान म्हणाले, खटकर कलां या गावात मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला एक खास कारण आहे. हे गाव भगत सिंह यांचे गाव आहे. अनेकजण राजवाड्यात आणि महालात शपथ घेतात. मात्र आम्ही स्वातंत्र्य सैनिकांच्या गावात जाऊन शपथ घेतली. ते कायम आमच्या ह्रदयात आहेत. मुख्यमंत्री म्हणून जनतेच्या समस्या दूर करण्याचा माझा प्रयत्न असेल.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुंकाचे निकाल नुकतेच काही दिवसांपूर्वी लागले आहेत. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने काँग्रेसची सत्ता उलथून लावत निर्विवाद बहुमत मिळवले. पंजाबमध्ये आपचे तब्बल 92 आमदार निवडून आले आहेत. पंजाबच्या निवडणूक इतिहासात प्रथमच एका पक्षाला एवढे बहुमत मिळाले. आणि एकदाचे आपचे भगवंत मान यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
