🕒 1 min read
मुंबई: पाकिस्तानने भारताच्या आयपीएलप्रमाणे पीएसएलचे आयोजन सुरू केले आहे, परंतु ते आयपीएलसारखे यशस्वी झालेले नाही. अशा परिस्थितीत पाकिस्तान सुपर लीग यशस्वी करण्यासाठी पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा सध्या अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. रमीझ राजाला आगामी पीएसएलसाठी काही महत्त्वाचे बदल करायचे आहेत जेणेकरून ते आयपीएलशी स्पर्धा करू शकेल. अशा परिस्थितीत शोएब मलिकनेही याबाबत आपले मत मांडले आहे.
रमीझ राजाच्या (ramiz raja) विचारांना साथ देत शोएब मलिक (Shoaib malik) म्हणाला, “आम्ही पीएसएल (PSL) सुधारण्यासाठी बरीच पावले उचलली आहेत, परंतु जर आम्हाला ते आयपीएल स्तरावर न्यायचे असेल, तर खेळातील सर्वात मोठ्या स्टार्सना आकर्षित करण्यासाठी आम्ही ड्राफ्टमधून ऑक्शन मॉडेलकडे जाण्याचा विचार केला पाहिजे. मला माहित आहे की आयपीएल ही एक विकसित लीग आहे आणि ती पीएसएलच्या अनेक वर्षांपूर्वी सुरू झाली होती, परंतु मला वाटते की आता आम्ही ब्रँड व्हॅल्यू वाढवण्यासाठी या मॉडेलकडे जाऊ शकतो. ही काळाची गरज आहे.”
आता रमीझ राजाच्या विचारांना शोएबच्या रूपात पाठींबा मिळाला आहे. मात्र ते खर्च यावर अंमलबजावणी करतील का हे केवळ वेळच सांगेल. परंतु हे सध्यातरी स्पष्ट आहे की येत्या पीएसएल हंगामातनक्कीच बरेच बदल पाहायला मिळतील. या वर्षीच्या PSL मध्ये, PCB ने प्रचंड नफा कमावला आणि त्यांचा नफा ७१ टक्क्यांपर्यंत वाढला जो २०१६ मध्ये लीग सुरू झाल्यापासून स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च ठरला आहे.
महत्वाच्या बातम्या
- सत्ता जाताच नवज्योत सिंग सिद्धूंचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; म्हणाले…
- अकोल्यात शिवसेनेचा पक्षांतर्गत वाद; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित जिल्हाप्रमुखांवर केले गंभीर आरोप
- Women’s WC 2022: भारताचा सामन्यात पराभव; मात्र झुलन गोस्वामीने केला वर्ल्ड रेकॉर्ड
- शरद पवार आणि संजय राऊतांची बंद दाराआड २० मिनिटे चर्चा!
- Women’s WC 2022: भारतीय संघाने गमावला वर्ल्डकपमध्ये दुसरा सामना; केवळ १३४ धावांवर परास्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
