Share

IPL 2022: बायो बबल तोडणाऱ्यासाठी बीसीसीआयचा कठोर शिक्षेचा निर्णय , दंडासह लागू शकते बंदी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएल सुरु होण्यासाठी फक्त १० दिवस उरले आहेत. जगातील नंबर वन टी-२० लीग सुरू होण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. दरम्यान सर्व आयपीएल फ्रँचायझींनी हंगाम सुरू होण्यापूर्वी सराव सुरू केला आहे. यासोबतच जवळपास प्रत्येक संघाने आयपीएल २०२२ साठी आपली नवीन जर्सी लाँच केली आहे. अशा परिस्थितीत आयपीएलच्या १५व्या पर्वासाठीचा टप्पा तयार झाला आहे. पण बीसीसीआयने आयपीएल सुरू होण्यापूर्वी बायो बबलबाबत नविन आणि कठोर नियम लागू केला आहे.

बीसीसीआयने (BCCI) आयपीएल २०२२ मध्ये बायो बबलसाठी जारी केलेल्या नियमांमध्ये असे म्हटले आहे की, जर खेळाडूच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने किंवा सामना अधिकाऱ्याने बायो बबलच्या नियमांचे उल्लंघन केले तर, खेळाडूला दंड ठोठावला जाईल. नवीन नियमांनुसार, जर एखाद्या आयपीएल (IPL) फ्रँचायझीने जाणूनबुजून बायो बबलच्या बाहेरच्या व्यक्तीला आपल्या संघात समाविष्ट केले, तर त्याला पहिल्या चुकीसाठी १कोटी रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. तसेच नंतर चूक झाली तर त्याचा थेट परिणाम संघाच्या गुणांवर होऊ शकतो.

यानंतर, बीसीसीआयने पुढे स्पष्ट केले की जर एखाद्या खेळाडूने पहिल्यांदा बायो बबल नियमांचे उल्लंघन केले, तर त्याला पुन्हा एकदा ७ दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये पाठवले जाईल आणि या दरम्यान तो किती सामने गमावेल याची त्याला मॅच फी देखील मिळणार नाही. दुसरीकडे, जर एखाद्या खेळाडूने दुसऱ्यांदा नियमाचे उल्लंघन केले तर त्याच्यावर एका सामन्यासाठी बंदी घातली जाईल आणि त्याला त्या सामन्याची मॅच फी मिळणार नाही. यासह, जर एखाद्या खेळाडूने तीच चूक पुन्हा तिसऱ्यांदा केली तर बीसीसीआय त्याच्यावर संपूर्ण हंगामासाठी बंदी घालेल आणि त्यानंतर फ्रँचायझीला त्याच्या बदलीचा पर्याय सुद्धा दिला जाणार नाही.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!