🕒 1 min read
मुंबई : ट्रॅक्टर खरेदी करताना शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न येतात. जसे की, किती एचपी ट्रॅक्टर घ्यायचा ? कोणत्या कंपनीचा ट्रॅक्टर घ्यावा? असे प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना पडत असतात. मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना सुद्धा परवडेल अशा ट्रॅक्टर विषयी सविस्तर माहिती घेऊया.
मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना उपयुक्त ट्रॅक्टर
शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदी करताना अनेक गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. ज्या शेतकऱ्यांकडे 5 ते 10 एकर जमीन आहे, तर अशा शेतकऱ्यांनी किमान 35 ते 40 HP चा ट्रॅक्टर खरेदी करावा, कारण शेतकरी वर्षभरात दोन हंगामात जास्तीत जास्त कामे करतात. या सर्व कामांसाठी किमान 50 ते 55 एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे.
ट्रॅक्टरला उत्पन्नाचे साधन-
ट्रॅक्टरमध्ये गवत आणि बाजरीच्या झाडांपासून भुसा तयार करण्यासाठी कुट्टा वापरता येतो. याच्या मदतीने तुम्ही गावोगाव जाऊन पेंढा बनवू शकता. ही आजच्या काळात प्रत्येक शेतकऱ्याची गरज आहे. 40 एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर हे यंत्र सहज चालवू शकतो. तुम्हाला तुमच्या ट्रॅक्टरमध्ये इतर कृषी यंत्रे टाकून काम करायचे असेल, जेणेकरून तुम्हाला कुठेही जावे लागणार नाही, तर तुम्ही 60 ते 70 एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर घ्यावा.
शेतीच्या कामाशिवाय इतर कामेही काही शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने करत असतात. शेतात खोदाई करून, ते एका ठिकाणी गोळा करणे, जर मजुरांचा अभाव असल्यास खते ट्रॉलीमध्ये भरण्यासाठी हाइड्रोलिकने केली जातात. ट्रॅक्टरमध्ये अधिक जड साधने लावण्यासाठी ६० ते ७० एचपीच्या ट्रॅक्टर हवा. जमीन समान सपाट करण्यासाठी सूपाचा वापर होत असतो.
शेतकऱ्यांच्या गरजेनुसार ट्रॅक्टर बनवतात –
जमिन खोदून विजेचे खांब गाडणे, या कामांसाठी साधरण ५० ते ५५ एचपीच्या ट्रॅक्टर असणे आवश्यक असते. शेतीसह इतर कामांकरिता जे शेतकरी ट्रॅक्टरचा उपयोग करतात. शेतातील खोदकाम करणे, खते ट्रॉलीमध्ये भरणे, मनुष्यबळ कमी असल्यास हाइड्रोलिक सिस्टमने ट्रॉलीमध्ये वस्तू भरल्या जातात. तसेच अधिक मोठे जड साधने ट्रॅक्टरला जोडण्यासाठी ६० ते ७० एचपीचे ट्रॅक्टरचा उपयोग करावा. देशातील अनेक अशा कंपन्या आहेत ज्या शेतकऱ्यांच्या गरजेनुसार ट्रॅक्टर बनवतात.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
