🕒 1 min read
मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपयश आलं आहे. त्यामुळे पुन्हा एका काँग्रेसच्या नेतृत्व बदलासंदर्भात चर्चा सुरु झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाचा आढावा घेण्यासाठी आणि भाजपला मात देण्याकरता नवी रणनीती आखण्यासाठी रविवारी (१३ मार्च) रोजी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी अध्यक्षपदासाठी निवडणूक होईपर्यंत सोनिया गांधी (Soniya Gandhi) काँग्रेस अध्यक्षपदी कायम राहतील, असा निर्णय या एकमताने घेण्यात आला. दरम्यान, असे असतांनाच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल, असा दावा केला आहे. त्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळत आहे.
यासंदर्भात नाना पटोले यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘२०२४च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच सर्वाधिक जागा मिळवील.’ तसेच पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल, असा दावा नाना पटोलेंनी केला आहे.
२०२४च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच सर्वाधिक जागा मिळवील. पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल.
— Nana Patole (@NANA_PATOLE) March 14, 2022
दरम्यान, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधी म्हणाल्या की, ‘जर काही लोकांना असे वाटत असेल की या परिस्थितीला गांधी कुटुंब जबाबदार आहे. त्यामुळे त्यांनी आपापल्या पदांचा राजीनामा द्यावा, तर आम्ही पक्षासाठी कोणताही त्याग करण्यास तयार आहोत. आम्ही पद सोडायला तयार आहोत.’ मात्र, सोनिया गांधींचा हा प्रस्ताव सीडब्ल्यूसीच्या सदस्यांनी लगेच फेटाळून लावला.
महत्वाच्या बातम्या
- बॉम्ब कुठेय विचारत धनंजय मुंडेंनी विधानसभेत दंड थोपाटले; विरोधकांना केले आवाहन
- “…तिथे ईव्हीएम काय आणि बॅलेट पेपर काय?”, भातखळकरांचा जितेंद्र आव्हाडांना जोरदार टोला
- IND vs SL: सुनील गावस्करांकडून बुमराहचे कौतुक म्हणाले “त्याला खेळणे अवघड”
- फातिमामुळे किरण रावशी घटस्फोट? आमिर खानने सांगितले सत्य…
- ‘राजकारणात युतीच्या चर्चा होतच असतात’ – बाळा नांदगावकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
