Share

काशीफळ, दुधीभोपळा या पिकांमधून महिन्याला घ्या लाखोंचे उत्पादन!

Published On: 

लातूर : काशीफळ, दुधीभोपळा हे पिक तीन महिन्याचे असते. या पिकातून एका एकरात लाखोंचे उत्पन्न शेतकरी घेऊ शकतात. या पिकाचा खर्च आणि लागवड व्यवस्थापन शेतकऱ्यांना परवडणारे आहे.

अशी करा लागवड –

काशीफळ, भोपळा ३ महिन्यात पदरी पडणारे पीक आहे. हे हंगामी पीक आहे. लागवडीआधी शेतीची मशागत करा. त्यानंतर बेड पध्दतीने बियाणांची लागवड करा. लागवडीनंतर खताचा डोस हा ठिबक सिंचनाद्वारेच द्या याचा अधिक परिणाम होतो. पहिला डोस झाल्यानंतर वॉटर सोल्यूशनद्वारे दर चार दिवसाला औषध फवारणी करा. तसेच खुरपणी, कुळवणी करुन पिकांची काळजी घ्या. काशीफळ, भोपळ्यात अ, क आणि इ जीवनसत्त्व असून, बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असते. प्रथिने, प्रोटीन, कर्बोदके, कॉपर, पोटॅशिअम, कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम यांचेही चांगले प्रमाण आढळते. तसेच काशीफळाच्या सेवनाने हृदयाचे व डोळ्याचे आरोग्य चांगले राहते. पचन सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, थकवा कमी होतो.

दोन्ही हंगामात उत्पादन –

उन्हाळी आणि खरीप हंगामातही भोपळ्याचे उत्पादन घेता येते. खास करून खरिपात लागवड केलेल्या भोपळ्याचे उत्पादन वाढते. खरीप हंगामात 2 ते 3 पाऊस चांगले झाले की जून किंवा जुलैमध्ये लागवड अधिक प्रमाणात घेतली जाते.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!