Share

रोहित शर्माच्या षटकाराने प्रेक्षकाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर; वाचा सविस्तर

Published On: 

बेंगलोर : क्रिकेटमध्ये फक्त खेळाडूंना नाही तर प्रेक्षकांना देखील सावध रहावे लागते. जेव्हा एखादा फलंदाज षटकार मारतो तेव्हा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते. अशीच एक घटना भारत आणि श्रीलंका यांच्यातील डे-नाईट कसोटी दरम्यान झाली. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने पहिल्या डावात २५२ धावा केल्या. तर दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेने ६ बाद ८६ धावा केल्या होत्या.

भारताच्या डावात कर्णधार रोहित शर्माने एक षटकार मारला. रोहित षटकार मारताना पाहून चाहत्यांना आनंद झाला असला, तरी मैदानावर एका प्रेक्षकासाठी धोकादायक ठरले. रोहितच्या षटकारामुळे प्रेक्षकाच्या नाकाचे हाड फॅक्चर झाले आहे. रोहितने डावाच्या सहाव्या षटकात फर्नांडोच्या शॉर्ट चेंडूवर डीप मिड विकेटच्या वरून षटकार मारला. रोहितने हा जबरदस्त शॉट मारला होता. कारण पुल शॉट मारण्यात त्याचा कोणी हात धरु शकत नाही. अधिक तर वेळा रोहितने मारलेल्या अशा शॉटवर षटकार मिळतो. श्रीलंकेविरुद्ध देखील असेच झाले. त्याने मारलेला चेंडू प्रेक्षकांच्या दिशेने गेला.

रोहितने मारलेला चेंडू सामना पाहण्यासाठी आलेला चाहता २२ वर्षीय गौरव विकास परवार याच्या चेहऱ्याला लागला आणि त्याच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले. वैद्यकीय रिपोर्टनुसार तो फिट आहे. चेंडू लागल्यानंतर त्याच्यावर प्रथम कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनच्या मेडिकल टीमने उपचार केले. आणि मग एका रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्या दुखापतीबद्दल बोलताना भाऊ राजेश म्हणाला, डॉक्टरांनी काही दिवासंनी टाके काढण्यास सांगितले आहेत.

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात रोहितने २५ चेंडूत १५ धावा केल्या. यात १ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक ९२ धावांची खेळी केली.

महत्वाच्या बातम्या : 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!