🕒 1 min read
मुंबई : राज्यातील पोलिसांच्या बदल्यांची गोपनीय माहिती उघड केल्या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. यावरून भाजप नेते आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तसेच देवेंद्र फडणवीसांचा दुसरा व्हिडीओ बॉम्ब येतोय, असा दावाही पाटलांनी यावेळी केला आहे.
यासंदर्भात बोलत असतांना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘एक व्हिडीओ बॉम्ब देवेंद्र फडणवीसांनी टाकला असून दुसरा व्हिडीओ बॉम्ब येतोय. एका व्हिडीओ बॉम्बने सगळं चिडीचूप झाले. दुसरा व्हिडीओ बॉम्ब तर खूपच स्ट्राँग आहे.’ तसेच आम्ही घारबणारे लोकं नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी संपूर्ण भाजप आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या पद्धतीने काम केले . त्यामुळे संपूर्ण जनता देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री आणि माजी गृहमंत्री आहेत. तसेच ते विरोधी पक्षनेते देखील आहेत. त्यांना काही घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळे त्यांना सोर्स विचारले जाऊ शकत नाहीत’, असेही पाटील यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- वेस्टइंडीज खेळाडूचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाला, इंग्लंड संघाने आमचा…
- वडिलांचा विरोध असतानाही नागराजने घरी आणला बाबासाहेबांचा फोटो; काय झाले पुढे?
- पोलीस पथक “सागर” बंगल्यावर रवाना; फडणवीसांचा जबाब नोंदवणे सुरु
- “…पण महाराष्ट्रात यश मिळेलच असं नाही”, गुलाबराव पाटलांचा भाजपला जोरदार टोला
- नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत मिळणार 65 टक्के अनुदान!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
