Share

IND vs SL: श्रेयस ठरला नर्व्हस नाईंटीजचा शिकार; नको असलेल्या यादीत नावाचा समावेश!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारत आणि श्रीलंका यांच्यातील शेवटचा आणि दुसरा कसोटी सामना बंगळुरू येथे सुरू आहे. या सामन्यात श्रेयस अय्यरने भारतासाठी सर्वात मोठी खेळी खेळली. संपूर्ण संघ दुसऱ्या सत्रात २५२ धावांवर गारद झाला असताना श्रेयसने संघाला तारले बेंगळुरूमध्ये सुरू असलेल्या या डे नाईट कसोटी सामन्यात, टीम इंडियासाठी फक्त श्रेयस अय्यरने शानदार अर्धशतक झळकावले आणि शतकापासून फक्त ८ धावा दूर राहिला. नर्व्हस नाईंटीचा शिकार झालेल्या अय्यरचे नाव दिग्गजांच्या नको असलेल्या यादीत समाविष्ट झाले आहे.

श्रेयस अय्यरने (shreyas iyer) ९८ चेंडूंचा सामना करत १० चौकार आणि ४ मोठ्या षटकारांच्या मदतीने ९२ धावा केल्या. पहिल्या डावात अप्रतिम खेळी केल्यानंतरही श्रेयस अय्यर कसोटी कारकिर्दीतील दुसऱ्या शतकापासून केवळ ८ धावा दूर राहिला. यादरम्यान तो स्टंप आऊट होऊन नर्व्हस नाइन्टीजचा बळी ठरला. यासह आता त्याचे नाव सचिन तेंडुलकर (sachin tendulkar) आणि वीरेंद्र सेहवाग (virendra sehwag) सारख्या भारतीय फलंदाजांच्या यादीत सामील झाले आहे. श्रेयस कसोटी क्रिकेटमधला चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे, जो नर्व्हस नाईन्टीजचा बळी ठरला आहे.

त्याच्याआधी महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागसारखे फलंदाजही नर्व्हस नाईन्टीजवर स्टंप आऊट झाले आहेत. सेहवाग २०१० मध्ये कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध ९९ धावांवर स्टंप आऊट झाला होता. सचिन तेंडुलकर २००१ मध्ये बेंगळुरूमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात यष्टीरक्षकाच्या हातून नर्व्हस नाईन्टीजचा बळी ठरला होता. त्यावेळी तो ९० धावा करून क्रीजवर खेळत होता. कसोटी क्रिकेटमध्ये नर्व्हस नाईन्टीजमध्ये स्टंप विकेट्सच्या या यादीत दिलीप वेंगसरकरच्या नावाचाही समावेश आहे. वेंगसरकर १९८७ मध्ये चेन्नईमध्ये पाकिस्तानविरुद्ध ९६ धावा असताना स्टंपवर बाद झाले होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!