Share

मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वीच भगवंत मान यांनी केली पहिली कारवाई!

Published On: 

🕒 1 min read

पंजाब : माजी आमदार आणि माजी मंत्र्यांशिवाय पंजाबमधील अनेक व्हीव्हीआयपींची सुरक्षा काढून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचनेनुसार केवळ सुखबीर, मनप्रीत आणि प्रकाश सिंह बादल यांच्या कुटुंबाला सुरक्षा मिळाली आहे.

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वीच आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान यांनी मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. मान यांच्या सूचनेवरून राज्य सरकारने अनेक व्हीव्हीआयपी आणि बड्या नेत्यांच्या सरकारी सुरक्षेला कात्री लावली आहे. येत्या काळात राज्यात अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळू शकतात, हे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचनेनुसार सुरक्षा देण्यात आलेल्या बादल कुटुंबाशिवाय कॅप्टन अमरिंदर सिंग आणि चरणजित सिंग चन्नी या माजी मुख्यमंत्री वगळता काँग्रेस आणि अकाली दलाच्या इतर सर्व नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली असून अनेक माजी आमदारांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.

याच्या एक दिवस आधी पंजाबचे नवे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी वेणू प्रसाद यांची प्रधान सचिव म्हणून नियुक्ती केली. वेणू प्रसाद हे १९९१ च्या बॅचचे आयएएस आहेत. आप नेते भगवंत मान 16 मार्च रोजी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तसेच आम आदमी पक्षाचे इतर आमदारही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. हा शपथविधी सोहळा नवांशहर जिल्ह्यातील खटकरकालन येथे आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पंजाबमध्ये विधानसभेच्या 117 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने 92 जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसला 18 जागा मिळाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!