Share

विराटचे ‘सेकंड होम’ चिन्नास्वामीनेही दिला धोका; शतक अजूनही प्रतीक्षेत!

Published On: 

मुंबई: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना आज बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. चिन्नास्वामीला विराटाचे सेकंड होम असे मानले जाते. मात्र विराट कोहली दुसऱ्या कसोटी सामन्यात केवळ २३ धावा करून स्वस्तात बाद झाला.विराट बँगलोरमध्ये तरी त्याचे प्रतिक्षीत शतक पूर्ण करेल अशी अशा चाहत्यांना होती.

भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली (virat kohli) सध्या त्याच्या खराब फॉर्मशी झगडत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याने १०० कसोटी सामने खेळण्याचा पराक्रम केला. १००व्या कसोटी सामन्यात तो ४५ धावा करून बाद झाला. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही तो काही विशेष करू शकला नाही. त्याने २३ धावा करून स्वस्तात विकेट गमावली. बाद झाल्यानंतर विराट निराश आणि नाराज दिसला.

पिंक बॉल सामन्यात विराट आणि हनुमा विहारी यांनी भारतीय डाव सांभाळण्याची आघाडी घेतली. झटपट विकेट पडल्यानंतर भारतीय संघाची पारी ढासळली होती. विराट कोहलीने ज्या प्रकारे आपल्या डावात दोन शानदार चौकार मारले, तो मोठी खेळी खेळेल असे वाटत होते. पण हे होऊ शकले नाही. विराट कोहली २३ धावा करून LBW चा बळी ठरला. तर हनुमा विहारी देखील फार काही करू शकला नाही, तो देखील ८१ चेंडू खेळून केवळ ३१ धावाच करू शकला.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!