Share

अरेरे! एका रॉकेट थ्रोने लबुशेनच्या नावे केला असा काही रेकॉर्ड ; कळताच डोक्याला हात लावला!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना कराची क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सगळेकाही सुरळीत चालू असताना या सामन्यात असे काही घडले ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लबुशेनच्या नावे एक २७ वर्ष जुना रेकॉर्ड नोंदवला गेला आहे.

झाले असे की, ऑस्ट्रेलियाच्या डावातील २१व्या षटकात पाकिस्तानी गोलंदाज नौमान अली गोलंदाजी करत होता. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मार्नस लबुशेन (marnus labuschange) स्ट्राईकवर होता, तर उस्मान ख्वाजा नॉन स्ट्रायकर एंडला उपस्थित होता. नौमान अलीच्या ५व्या चेंडूवर मार्नसने मिडऑफच्या दिशेने चेंडू हलका मारला आणि धाव चोरण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी मिड-ऑफवर पोस्ट केलेला साजिद अली अत्यंत वेगाने चेंडूकडे धावला आणि बॉल हातात घेऊन एका क्षणात स्टंपवर आदळला. यानंतर सर्व पाकिस्तानी क्षेत्ररक्षकांनी अपील केले, थर्ड अंपायरच्या रिप्लेमध्ये मार्नस लॅबुशेन क्रीजपासून काही इंच दूर असल्याचे दिसून आले. यासह, २७ वर्षांनंतर असे घडले आहे की ऑस्ट्रेलियाचा नंबर-३ फलंदाज शून्यावर रन आऊट झाला.

मार्नस लबुशेनचा डोक्याला हात लावलेला आणि निराश झालेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (PAK vs AUS) यांच्यात कराची येथे खेळल्या जात असलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 3 विकेट गमावून २५१ धावा केल्या आहेत. मार्नस लॅबुशेन शून्यावर बाद झाल्यानंतर स्टीव्ह स्मिथ (७२) आणि ख्वाजा यांच्यात १५९ धावांची भागीदारी झाली. त्यामुळे पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २५१/३ आहे. आता दुसऱ्या दिवशी उस्मान ख्वाजा आणि नॅथन लायन ऑस्ट्रेलियाचा डाव पुढे नेतील.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!