🕒 1 min read
सिंधुदुर्ग : काल(११ मार्च) पत्रकार परिषदेत बोलत असतांना भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना रोजगाराची संधी निर्माण व्हावी यासाठी कुडाळ एसटी डेपो येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असून हा रोजगार मिळावा १६ मार्च रोजी होणार आहे अशी माहिती दिली. यावेळी निलेश राणेंनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षावही केला. तसेच महाराष्ट्राचा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) होऊ शकत नाही, असेही निलेश राणे म्हणाले.
यावेळी बोलत असतांना निलेश राणे म्हणाले की,‘मी अर्थसंकल्प पाहिलेला नाही अधिकाऱ्यांनी सांगितलेला अर्थसंकल्प मांडणे हे काही मोठे काम नाही मात्र हा अर्थसंकल्प तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.’ तसेच अजित पवारांना टक्केवारी कळते पण त्यांना फायनान्स कळत नाही. त्यामुळे महाराष्ट्राचा अर्थमंत्री अजित पवार होऊ शकत नाही, असे निलेश राणे म्हणाले.
दरम्यान, पुढे रोजगारावरून शिवसेनेवर निशाणा साधत निलेश राणे म्हणाले की,‘हे रोजगार देऊ शकत नाहीत यांनी या काळात कोणतेही महत्त्वाचे काम केलेले नाही आणि त्यांच्याकडून ती अपेक्षाही नाही.’
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022: मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिलेल्या फिंचची आयपीएलमध्ये ‘या’ संघात लागली वर्णी!
- “चार राज्यांतील विजयाने ही वृत्ती वाढणारच असेल तर…”, संजय राऊतांचा हल्लाबोल
- IND vs SL: दुसऱ्या कसोटीत रोहित शर्मा रचणार नवीन इतिहास ; ‘हा’ मोठा रेकॉर्ड आपल्या नावे करण्यासाठी सज्ज!
- IND vs SL: बंगळुरू कसोटी सामन्यात अक्षर पटेलला ‘हा’ १३३ वर्ष जुना रेकॉर्ड आपल्या नावे करण्याची मोठी संधी !
- ‘समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प’ – एकनाथ शिंदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
