Share

विम्याच्या रकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये त्वरीत जमा करा; कृषी आयुक्तालयाचा आदेश!

Published On: 

🕒 1 min read

लातूर : मधल्या काळात शेतकरी अपघात विमा योजनेची प्रक्रिया थांबविली होती. यामुळे प्रत्यक्ष मदत ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नव्हती. आता ही समस्या सुटली आहे. विम्याच्या रकमा बॅंक खात्यामध्ये त्वरीत जमा करण्याच्या सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत.

योजना बंद होती त्या काळात 1 हजार 168 शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू तर 17 अपंगत्व एवढे दावे जमा झाले होते. योजना सुरु केल्यामुळे आता या सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत होणार आहे. अपघातामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर 2 लाख आणि अपंगत्व आले तर 1 लाख रुपये एवढी मदत दिली जाते. यामुळे आता कित्येक दिवासांपासून प्रतिक्षेत असणाऱ्या शेतकरी कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे. कृषी आयुक्तालयाने खंडीत कालावधीत मंजूर करण्यात आलेल्या शिफारशी राज्य सरकारकडे पाठविल्या असल्यामुळे याला मंजूरी मिळाली आहे. आता विम्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

अपघात विमा योजनेची प्रक्रिया –

पोलिस पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट, सातबारा, आठ ‘अ’, 6 क, 6 ड, मृत्यृ प्रमाणपत्र, ज्यांचा अपघात झाला आहे त्या शेतकऱ्याचे वारसा प्रमाणपत्र, वारसा अर्जदार इत्यादी कागदपत्रे ही कृषी विभागात जमा करावी लागतात. कृषी विभाग नियुक्त केलेल्या विमा कंपनीकडे या कागदपत्रांची पूर्तता करतात. त्यानंतर योग्य ती चौकशी होऊन संबंधित शेतकऱ्यास किंवा शेतकरी कुटुंबास विमा रक्कम दिली जाते.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!