Share

२०२४ मध्ये भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार येईल- देवेंद्र फडणवीस

Published On: 

मुंबई: गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळवून देणारे गोवा प्रभार तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आज मुंबईत ढोल-ताशाच्या गजरात आणि घोषणांनी जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठा दावा केला आहे. २०२४ मध्ये भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार येईल, असे ते म्हणाले आहेत.

“मुंबई महापालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढत नाही तोपर्यंत आम्ही दम घेणार नाही. आज विजय साजरा करा, उद्यापासून कामाला लागा. आता महाराष्ट्रात सत्तांतर अटळ असून, २०२४ मध्ये भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार येईल.”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

दरम्यान विजयाने नम्र व्हायचं, विजयाने मेहनत करायची आहे. ‘अभी तो असली लडाई मुंबई में होगी’ आम्हाला मुंबईला कोणत्या पक्षापासून वेगळं करायचं नाही. आम्हाला मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करायचं आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही. आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात मैदानात उतरलो आहोत. असेही फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!