Share

आम आदमीचा इंक़लाब!

Published On: 

महाराष्ट्र देशा ब्यूरो/अभिलाष अपसिंगेकर: गेल्या अनेक महिन्यांपासून देशभरात निवडणुकांची रणधुमाळी सुरू होती. भाजपच्या विरोधात पर्यायी पक्ष स्थापन करण्याचा देखील इतर सर्वच मोठ्या पक्षांनी प्रयत्न केले. मात्र पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. या पाच राज्यांपैकी एका राज्यात मात्र भाजपसह इतर सर्वच पक्ष सपशेल आपटले आहेत. हे राज्य म्हणजे पंजाब.

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने बहुमत मिळवले आहे. एखाद्या राज्यात बहुमत मिळवण्याची आम आदमी पक्षाची ही पहिलीच वेळ. दिल्लीमध्ये सरकार असले तरी शेवटी दिल्ली एक केंद्रशासित प्रदेश आहे. त्या उलट पंजाब एक महत्वाचं राज्य आहे. पंजाबमध्ये ज्या काही घडामोडी घडत होत्या त्या आम आदमी पक्षाला अनुकूल ठरत गेल्या, असं म्हणायला काही हरकत नाही. भाजपचं पंजाबमध्ये निवडून येणं हे अपेक्षित नव्हतच, त्यामागचं कारण म्हणजे शेतकऱ्यांच्या मनात असलेला भाजपबद्दल आक्रोश. पंजाबमध्ये कॉंग्रेसची सत्ता होती मात्र नेतृत्व बदल जे काही कॉंग्रेसकडून करण्यात आलं, कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या जागी चरणजीत सिंह चन्नी मुख्यमंत्री म्हणून आले. या सगळ्यात लोकांचे नेमके प्रश्न काय आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे या सर्वांकडे दुर्लक्ष होत होतं. त्यामुळे पंजाबच्या जनतेने आम आदमी पक्षाला आपला कौल देत बहुमताने निवडून दिले.

आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये केलेल्या कामाचे भारतभर कौतुक झाले आहे. त्यांनी पुरवलेल्या सुविधा, शाळा, वीज, अशा अनेक गोष्टींचा विचार करून जनतेने आम आदमी पक्षाला निवडून दिले, असं म्हणलं तर त्यात वावगे काही ठरणार नाही. प्रस्थापित पक्षांना डावलून परिवर्तन आणि विकास कामांना महत्व देऊन पंजाबच्या जनतेने तसं बघायला गेलं तर एक आदर्शच देशासमोर ठेवला आहे. हा खऱ्या अर्थाने ‘आम आदमी’चा इंक़लाब म्हणावा लागेल.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!